Bachchu Kadu : नगर : देशभराचे लक्ष लागलेली महाराष्ट्राच्या विधानसभेचे मतदान (Maharashtra Assembly Elections) संपल्यानंतर एक्झिट पोलचे (Exit Poll) निर्णय येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलचे निर्णय पाहता महायुतीला व महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाहीये. अशा स्थिती राहिल्यास अपक्ष व इतर लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सत्तास्थापनेत लहान पक्षांना, अपक्षांना मोठा वाटा मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे वक्तव्य आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केले आहे.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील’- संजय शिरसाट
बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल
यावर वक्तव्य करताना प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख व अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे म्हणाले की, “राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. एक्झिट पोलचे आकडे पाहता कोणाची सत्ता येईल हे सांगता येत नाही. मात्र आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो”.
अवश्य वाचा : आमदार मोनिका राजळे यांच्यावर जमावाकडून दगडफेक
नेमके कोणाचे सरकार स्थापन होणार (Bachchu Kadu)
राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधून आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचे दावे करत आहेत. एक्झिट पोलमधून राज्यात त्रिशंकू परिस्थिती होईल अशी स्थिती आहे. यामुळे नेमके कोणाचे सरकार स्थापन होणार हे शनिवारी (२३ नोव्हेंबर) दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.