Bachchu Kadu : श्रीगोंदा : सरकारकडून (Government) शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी पैशाचे सोंग घेता येत नाही असे सांगणाऱ्याचा ७० हजार कोटींचा गफला माफ करून त्याच्या मांडीला मांडी लाऊन बसणाऱ्यांनी फक्त सत्तेचे गणित केले असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सांगत शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल केला.
शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्यभर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शेतकरी मेळावा तसेच नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
अवश्य वाचा: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री केवळ फोटोसेशन करतात : थोरात
माजी मंत्री कडू म्हणाले,
सरकारने शेतकरी हितापेक्षा जाती पातीचे राजकारण सुरू केले आहे. मात्र जाती पातीचे राजकारण करत असताना सर्व जाती धर्मात शेतकरी असल्याचे सरकार विसरले आहे. विधानसभेत गेलेल्या आमदारांपैकी ७० टक्के आमदार हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मतदानावर निवडून गेलेले आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवताना पक्ष पार्टीच्या नावाखाली गप्प बसलेले दिसून येत आहेत. छत्रपतींच्या राज्यात शेतकरी उपाशी मरत आहे. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची लक्तरे तोडली जात आहे. जो लक्तरे तोडत आहे त्यालाच आपण निवडून देत आहे. शेतकऱ्याने पिकविलेले पीक डोळ्या देखत वाहून जाताना प्रचंड वेदना होतात. आणि सरकारकडून शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम करण्यात येत असल्याची खंत व्यक्त केली.
नक्की वाचा : मोठी बातमी!आता लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज!
अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन (Bachchu Kadu)
कर्जमाफीसाठी सरकारने पाऊल नाही उचलले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरासमोर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला. सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी झोपेचे सोंग घेतले आहे. शेतकऱ्यांची पोर आमदार खासदार मंत्री झाले असताना देखील त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची ताकद दाखविल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही, असे माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी सांगितले. यावेळी विनोद परदेशी, मधुकर लगड, संपत शिरसाट, सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हेमंत नलगे, सुरेश सुपेकर, राजेंद्र पोकळे, वामन भदे, विश्वास थोरात,, नितीन डुबल यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.