Bacchu Kadu:’गरज सरो वैद्य मरो,हीच भाजपची भूमिका’;बच्चू कडूंचा प्रहार 

0
Bacchu Kadu:'गरज सरो वैद्य मरो,हीच भाजपची भूमिका';बच्चू कडूंचा प्रहार 
Bacchu Kadu:'गरज सरो वैद्य मरो,हीच भाजपची भूमिका';बच्चू कडूंचा प्रहार 

Bacchu Kadu : ‘गरज सरो आणि वैद मरो’, ही भाजपची नेहमीची भूमिका असल्याची टीका करत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) लक्ष्य केलं आहे.यावेळी ते म्हणाले की,देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेसाठी फोन केला होता. मात्र माझ्या मतदारसंघासाठी काही मदत हवी आहे का? काही निधी हवा आहे का? यासाठी कधीही त्यांनी फोन केला नाही. किंबहुना मित्रता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही मला फोन केला नाही,असा घणाघात प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला.

नक्की वाचा : कधी होणार यंदाचा महा कुंभमेळा? वाचा सविस्तर...

‘मला पराभूत झाल्यावर ही आनंद’ (Bacchu Kadu)

जाती-धर्माकडे एकंदरीत निवडणूक नेण्याचा परिणाम झाला. त्यामुळे माझा पराभव हा तांत्रिक पराभव आहे. ईव्हीएम मशीनचा ही त्यात सहभाग आहे. माझी ही गफलत झाली. मात्र मी पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता वाढेल. मला पराभूत झाल्यावर ही आनंद आहे. कारण मी दिव्यांगांसाठी काम करतोय. अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांनी ही आपल्या पराभवाचे कारण सांगत ईव्हीएम मशीनला जबाबदार ठरवले आहे.  

अवश्य वाचा : अभिनेत्री रिंकू राजगुरूने केली नव्या चित्रपटाची घोषणा! मुहूर्त पडला पार

दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार(Bacchu Kadu)

राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत. त्यात दिव्यांग, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत राहण्याचा विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात पैसा आणि जात माझ्या विजयाच्या वाटेत आली. विरोधकांनी बच्चू कडूला टार्गेट करून अभियान राबवविलं. तसेच भारतीय जनता पार्टी म्हणजे “गरज सरो वैद्य मरो” मलाही याचा अनुभव आलेला आहे. त्यांच्या मदतीसाठी फडणवीस यांचा फोन येतो, मात्र त्यानंतर ते बच्चू कडूंना विसरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here