Badalapur Crime : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) निर्दोष असल्याचा मोठा दावा आरोपीच्या आई वडिलांनी केला आहे. बदलापूर (Badlapur Crime) या ठिकाणी असलेल्या नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातल्या आरोपीला फाशी झाली पाहिजे, ही मागणी करत मुलींच्या पालकांसह बदलापूरकरांनी आंदोलन केलं. या घटनेला चोवीस तास उलटताच आता आरोपीच्या आई वडिलांनी हा मोठा दावा केला आहे.
नक्की वाचा : नराधमांना छत्रपती शिवरायांच्या काळातील ‘चौरंग’ शिक्षा द्या,रितेश देशमुखची मागणी
‘आरोपी अक्षयबद्दलचे दावे कुटुंबियांनी फेटाळले’ (Badalapur Crime)
बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर या शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने राज्यात संतापाची लाट पसरत आहे. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे घाणेरडे कृत्य केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टला पहायला मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. आता अक्षय शिंदेंच्या आई वडिलांनी केलेल्या अजब दाव्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. आरोपी अक्षय शिंदेची तीन लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अक्षयच्या पत्नी त्याला सोडून गेल्याचे समोर आले होते. परंतु,अक्षयबद्दलचे दावे त्याच्या कुटुंबियांनी फेटाळून लावले आहेत. आई-वडिलांनी काही खुलासे करत,अक्षय निर्दोष असून, त्याच्याबाबत खोट्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!फळ आणि फुलांच्या लागवडीसाठी मिळणार अनुदान
‘आमचे सर्व कुटुंब शाळेत काम करायचे’ (Badlapur Crime)
अक्षयचे आई वडील यावेळी म्हणाले की,अक्षयला कामाला लागून आता फक्त पंधरा दिवस झालेत. १३ तारखेला या प्रकरणाबाबत आम्हाला माहिती मिळाली. अक्षयला १७ तारखेला पकडून घेऊन गेले. याबाबत आम्हाला काहीच सांगितले नाही. शाळेत काम करणाऱ्या एका बाईने आम्हाला सांगितलं की, अक्षयला पकडून नेले. आम्हाला ही गोष्ट समजल्यानंतर तिथे गेलो, तर पोलीस अक्षयला मारत होते.आम्ही पोलीस ठाण्यात गेलो, त्यावेळी पोलिसांनी त्या घटनेबाबत सांगितले. आमच्या घरातील सगळ्यांनाच मारहाण झाली आहे. अक्षयकडे फक्त ११ वाजता शाळेतील बाथरूम धुवायचे काम होते. आमचे सर्व कुटुंब शाळेत काम करायचे. शाळेत झाडू मारण्याचे काम आमच्याकडे होते. संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही शाळेत जायचो आणि काम आटपून घरी परतायचो. माझ्या मुलाने हा काही प्रकार केलेला नाही, असं अक्षयच्या आईने सांगितलं.