Badminton tournament : नगरमध्ये रंगणार बॅडमिंटनचे सामने; ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल

Badminton tournament : नगरमध्ये रंगणार बॅडमिंटनचे सामने; ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल

0
Badminton tournament : नगरमध्ये रंगणार बॅडमिंटनचे सामने; ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल
Badminton tournament : नगरमध्ये रंगणार बॅडमिंटनचे सामने; ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल

Badminton tournament : नगर : नगर शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रविवारी (ता. ७) १७ वर्षांआतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि १५ वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे (Badminton tournament) उद्घाटन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या हस्ते होणार आहे. सहा दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल झाले आहेत. तर ६० संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघाची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) व बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सदस्य मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

Badminton tournament : नगरमध्ये रंगणार बॅडमिंटनचे सामने; ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल
Badminton tournament : नगरमध्ये रंगणार बॅडमिंटनचे सामने; ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल

नक्की वाचा: शालिनी विखे पाटलांचे पांडुरंगाला साकडे; पाऊस पडू दे.. शेतकरी सुखी होऊ दे.. संकटे दूर कर

स्पर्धा आयोजनाचा नगर जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा मान

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने व नगर बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने बॅटलडोर बॅडमिंटन असोसिएशनतर्फे कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ जुलै ते ८ जुलै दरम्यान १७ वर्षांआतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा होणार आहे. तर ९ ते १२ जुलै दरम्यान वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा आयोजन करण्याचा सलग दुसऱ्यांदा मान नगर जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धेसाठी योनेक्स सनराइज या कंपनीचे मुख्य स्पॉन्सरशिप मिळाली आहे. स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनकडून मयूर घाटनेकर (ठाणे), मनोज कान्हेरे (सातारा) उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सहकार्य मिळत आहे.

Badminton tournament : नगरमध्ये रंगणार बॅडमिंटनचे सामने; ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल
Badminton tournament : नगरमध्ये रंगणार बॅडमिंटनचे सामने; ३२ जिल्ह्यातून ६०० खेळाडू शहरात दाखल

अवश्य वाचा: जिल्हादंडाधिकाऱ्यांचे १२ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

दिवसाला ३०० मॅचेसचे नियाेजन (Badminton tournament)

वाडियापार्कच्या बॅडमिंटन हॉलमधील कोर्टवर एकाच वेळेस ८ मॅचेस चालणार आहे. दिवसाला ३०० मॅचेसचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून स्पर्धेला प्रारंभ होणार असून, रात्री ९ वाजेपर्यंत स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेच्या दृष्टिकोनाने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here