Badminton Tournament : नगर : माजी आमदार स्व. अरुण जगताप (Arun Jagtap) यांच्या स्मरणार्थ बॅटल डोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या वतीने अहिल्यानगर शहरात १५ ते १७ वयोगटाखालील मुलामुलींच्या महाराष्ट्र (Maharashtra) सब -ज्युनियर राज्यस्तरीय अंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धांचे (Badminton Tournament) आयोजन करण्यात आले आहे.
नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार उदघाटन
शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये ता. १२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धांचे उदघाटन रविवारी (ता.१२) सकळी ९ वाजता शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार असून, उच्च प्रतीच्या खेळाचा थराराचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन व अहिल्यानगर बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धांच्या नियोजनासाठी आमदार जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलची पाहणी केली. यावेळी प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, स्पर्धेचे संयोजक मिलिंद कुलकर्णी व मल्हार कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक संजय धोपावकर, जिल्हा संघटनेचे खजिनदार राहुल मोटे, विशाल गर्जे, ऑलिम्पिक असोसिएशनचे शैलेश गवळी, ज्ञानेश्वर रासकर, अजय भोयर, अजय कविटकर आदी यावेळी उपस्थित होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Badminton Tournament)
अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची निवड होणार असल्याने या स्पर्धा खूप महत्वाच्या आहेत. या स्पर्धा उत्कृष्टपणे व्हाव्यात यासाठी सर्व नियोजन करत आहोत. नगरमध्ये क्रियाशील क्रीडा संघटनांच्या चांगल्या कामांमुळे अनेक खेळाडू घडत आहेत. असेच अजून चांगले खेळाडून निर्माण व्हावेत यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असतात. या खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे.