Badminton Tournament : नगर : शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये माजी आमदार स्व.अरुण जगताप (Arun Jagtap) यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या बॅटल डोअर स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित योनेक्स सनराईज महाराष्ट्र सब-ज्युनियर राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत (Badminton Tournament) सांघिक सामन्यांना मुलींच्या रायगड (Raigad) जिल्ह्याने बाजी मारली आहे. तर मुलांमध्ये पुणे संघ अजिंक्य ठरला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर
उपांत्यपूर्व व अंतिम सामने अत्यंत चुरशीचे
सोमवारी सायंकाळी झालेल्या उपांत्यपूर्व व अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले. मुलींमध्ये रायगड संघाने पूना संघावर २ विरोधात शून्य अशी मात केली आहे. रायगडाच्या गाथा सूर्यवंशी व अनुष्का आपटे अजिंक्य ठरल्या.
नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर
जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित (Badminton Tournament)
मुलांच्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये पुणे संघाने छत्रपती संभाजीनगर संघावर दोन विरोधात शुन्य अशी मात केली. तर ठाणे संघाने सांगली जिल्ह्यावर एक विरोधात दोन अशी मात केली. अंतिम सामन्यात पुणे संघाने ठाणे जिल्ह्यावर मत करत अजिंक्यपद पटकावले. पुणे जिल्ह्याचे ओजस जोशी व अवधूत कदम संघ विजयी झाले आहे, अशी माहिती प्रमुख पंच विश्वास देसवंडीकर यांनी दिली. अंतिम सामन्यांच्या टॉस च्या वेळी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, स्पर्धा संयोजक मिलिंद कुलकर्णी, उद्योजक शशी घीगे, विकी जगताप, क्रीडा प्रशिक्षक निलेश मदने, महावीर भंडारी आदी उपस्थित होते.