Bailgada Sharyat : नगर : भिंगार (Bhingar) येथील मोरे मळा परिसरात विनापरवाना बैलगाडा शर्यत नागपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत एकाला बैलाची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत प्रेक्षकांच्या सुरक्षेतीची काळजी न घेता बैलगाडा शर्यत (Bailgada Sharyat) आयोजकांवर भिंगार कॅम्प पोलीस (Bhingar Camp Police) ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?
आलमगीर ते मोरे मळा रोडवर बैलगाडा शर्यतीचे आयोजन
संजय आसाराम जाधव (वय ५५, रा.बोल्हेगाव गावठाण) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २९) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आलमगीर ते मोरे मळा रोडवर घडली. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचा मार्ग आलमगीर ते मोरेमळा जाणारे रोडवरून मोरे मळा असा ठरवला.
नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल
गोंधळाने बैलगाडा मार्ग सोडून घुसला प्रेक्षकांमध्ये (Bailgada Sharyat)
शर्यतीच्या दरम्यान होणाऱ्या आवाजाच्या गोंधळाने एका बैलगाड्याने त्याचा मार्ग सोडून तो थेट प्रेक्षकांमध्ये घुसला. तेथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या संजय जाधव यांना बैलाची धडक बसली. या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय मोरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आबासाहेब मल्हारी गोरे, गोकुळ अनिल पवार (दोघे रा.मोरे मळा, भिंगार, अ.नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.