Bailpola : कर्जत : कर्जत शहरात आणि तालुक्यातील बहुतांश भागात श्रावणी बैलपोळा (Bailpola) उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा मान्सून पावसाच्या (Rain) जोरदार हजेरीने शेतकरी (Farmer) आणि पशुपालक सुखावला असला तरी वाढती महागाईने (Inflation) बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला. मात्र, काही ठराविक शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा-राजासाठी मोठ्या आनंदाने खरेदी करीत बैलपोळा साजरा केला. शहरातील कापरेवाडी वेस येथे सजवलेले सर्जा-राजा सर्वांचे लक्ष वेधत होते.
अवश्य वाचा : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी : सुजय विखे पाटील
सर्जा-राजाच्या श्रृंगारासाठी दुकाने सजली
यंदा मान्सून पावसाच्या जोरदार हजेरीने श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाजारपेठेत सर्जा-राजाच्या श्रृंगारासाठी दुकाने सजली गेली होती. मात्र, वाढती महागाई यासह शृंगार साहित्याचे वाढलेले दराने सर्वसामान्य शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. मात्र, अशा अवस्थेत देखील सकाळपासूनच लाडक्या सर्जा-राजास स्वच्छ पाण्याने अंघोळ घालीत त्यास रंगविण्यात आले होते. पाठीवर मखमली झुल, कानास गोंडा, शिंगास मोर पिसे, पायाला छमछम वाजणारे घुंगरूने वातावरण दुमदुमले होते.
नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज
बैलपोळ्यास बैल जोडी संख्या कमालीची घटली (Bailpola)
लाडक्या सर्जा आणि राजाला गुलालात तर काही पशुपालकांनी हळदाची उधळण करीत ढोल-ताशात वाजतगाजत बैलजोड्या कापरेवाडी वेशीत आणल्या. शेवटी पोळा फुटताच आपआपल्या घरी विधीवत पूजा करून सर्जा-राजास गोड घास भरविण्यात आला. यांत्रिकीकरण शेतीमुळे अगोदरच बैलजोडी नामशेष होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या बैलपोळ्यास बैल जोडी संख्या कमालीची घटली होती. सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती तरी देखील सर्जा-राजाच्या मिरवणुकीसाठी मोठी गर्दी पहावयास मिळाली.