Balasaheb Haral : नगर : राज्यात सर्वात प्रथम २००७ मध्ये नगर तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग झाला. तब्बल १५ वर्ष लोणीकरांसह भल्या भल्यांना पाणी पाजणाऱ्या या महाआघाडीला प्रवरेच्या नादाला लागून दृष्ट लावण्याचे पाप आमच्या एका मित्राने केले आहे. पण आता तुम्ही त्याच्या नादी लागून भावनिक होऊ नका, नगर तालुक्याची लेक असलेल्या राणी लंके (Rani Lanke) यांनाच या निवडणुकीत (Elections) मतदान करून आमदारकीची ओवाळणी द्या, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ (Balasaheb Haral) यांनी केले.
नक्की वाचा : झाशीमध्ये मृत्यूतांडव! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू
राणी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, माधवराव लामखडे यांनी अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्यावर टीकास्र सोडले.
अवश्य वाचा : शेतकरी व नागरिकांनी आमदारांच्या फोटोला दुग्धाभिषक करत केले अनोखे स्वागत
हराळ म्हणाले (Balasaheb Haral)
नगर तालुका महाआघाडीला प्रवरेची नजर लागली आहे. आमच्या मित्राला सर्वांनी सांगितले. टेंडर भरू नको, आम्ही या पूर्वी भरलेले टेंडर फेल गेलेले आहे. फक्त लावालावी करून द्यायची आणि गंमत बघायची ही लोणीकरांची सवय आहे. त्यांचे टेंडर भरून पापाचे वाटेकरी होऊ नका, पण त्यांनी नाही ऐकले. आता तुम्हीही त्यांचे ऐकू नका भावनिक होऊ नका, असे सांगितले.