Balasaheb Thorat : पेपरफुटी प्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी : आमदार थोरात

Balasaheb Thorat : पेपरफुटी प्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी : आमदार थोरात

0
Balasaheb Thorat : पेपरफुटी प्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी : आमदार थोरात
Balasaheb Thorat : पेपरफुटी प्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी : आमदार थोरात

Balasaheb Thorat : संगमनेर: सध्या अनेक परीक्षांमध्ये (NEET) पेपरफुटी सारख्या गंभीर घटना घडत असून त्या अत्यंत गंभीर व दखलपात्र आहे. त्यामुळे पेपरफुटी विरोधात दोषींवर कठोर कारवाई (Strict Action) झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत केली आहे.

नक्की वाचा: नसतं साहस जीवावर बेतलं; भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडताना आमदार थोरात म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात तलाठी भरती प्रक्रिया झाली. मात्र, या परीक्षेत आहे त्या मार्कांपेक्षा काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळाले. ही घटना अत्यंत गंभीर असून यात अनेकजण सहभागी आहे. त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक तरुण खूप कष्ट करून सातत्याने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. मात्र, काही जणांना अशा प्रकारची जास्तीचे मार्क मिळतात, हा त्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे.

अवश्य वाचा: ‘आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री’- संभाजी भिडे

देश पातळीवर ही घटना अत्यंत गंभीर (Balasaheb Thorat)

नीट परीक्षेसारख्या महत्त्वाच्या परीक्षेतही अशा बाबी घडल्या. देश पातळीवर ही घटना अत्यंत गंभीर आहे व विचार करायला लावणारी आहे. सरकारमध्ये आता अनेक विभागांमध्ये लाखो रिक्त जागा असून याबाबत कोणतीही भरती होत नाही. भरती झाली तरी त्यात मोठ्या प्रमाणावर घोटाळे होतात, त्यावर सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे. तसेच हे घोटाळे थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न केले पाहिजे, असेही यावेळी आमदार थोरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here