Balasaheb Thorat : नगर : ”ते मोठ्याचं लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल, तर तो पुरवला पाहिजे, या मताचा मी आहे. पक्षाने नाही, तर तो पालकाने पुरवला पाहिजे. ते दोन ठिकाणी म्हटले आहेत. त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल,” असे म्हणत काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थाेरात (Balasaheb Thorat) यांनी सुजय विखे पाटलांची (Sujay Vikhe Patil) खिल्ली उडवली आहे.
नक्की वाचा: मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द
थोरात यांनी सुजय विखे पाटील यांची उडवली खिल्ली
माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा सुजय विखेंनी व्यक्त केली आहे. यावरून आता थोरात यांनी सुजय विखे पाटील यांची खिल्ली उडवली आहे. बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
अवश्य वाचा : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुजय विखे विरुद्ध थोरात किंवा तनपुरे सामना रंगण्याची शक्यता (Balasaheb Thorat)
सुजय विखे यांनी जर संगमनेरमधून निवडणूक लढवली तर बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे लढत होऊ शकते. तर प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सुजय विखेंनी जर राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे सामना रंगण्याची शक्यता आहे.