Balasaheb Thorat : महाविकास आघाडीशी समन्वय साधण्याची जबाबदारी आता आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर

Balasaheb Thorat

0
Balasaheb Thorat

Balasaheb Thorat : नगर : काँग्रेस पक्षाचे नाना पटोले (Nana Patole) व शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाचे संजय राऊत (Sanjay Raut) या दोघांमध्ये गेल्या काही दिवसात खटके उडालेले दिसले. त्यामुळेच महाविकासाआघाडीमध्ये निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची जबाबदारी आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा: विधानसभेमुळे पोलिसांच्या सुट्ट्या,रजा २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द!

थोरात यांचे पक्षाअंतर्गत वजन वाढले

राज्यातील काँग्रेस नेत्यांना काल दिल्लीत पाचरण करण्यात आले होते. त्या सर्वांसमोर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली. या नव्या जबाबदारीने थोरात यांचे पक्षाअंतर्गत वजन वाढण्याचे सांगितले जात आहे.

Balasaheb Thorat

नक्की वाचा: भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू

काँग्रेसच्या वरिष्ठांनी सोपविली जबाबदारी (Balasaheb Thorat)

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून संजय राऊत व नाना पटोले यांच्यात शाब्दिक कुरघोडी पाहण्यास मिळाली. यानंतर माध्यमांसमोर येत दोघांनीही सर्व सुरळीत असल्याचे जाहीर केले. परंतु अनेक अफवा व बातम्यांमुळे महाविकास आघाडी संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. या सर्व हालचालींवर बारीक लक्ष असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठांनी महाराष्ट्रातील नेत्यांना काल दिल्लीत पाचारण केले. सर्वांशी चर्चा केल्यानंतर समन्वयाची जबाबदारी थोरात यांच्यावर सोपवण्याचा निर्णय पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतला. थोरात यांनीही उत्साहाने नवी जबाबदारी स्वीकारत आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. नंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळाली.