Balasaheb Thorat : माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न होतोय : थोरात 

Balasaheb Thorat : माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न होतोय : थोरात 

0
Balasaheb Thorat : माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न होतोय : थोरात 
Balasaheb Thorat : माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न होतोय : थोरात 

Balasaheb Thorat : संगमनेर : मी राजकारण (Politics) करताना जातीय भेदभाव कधीच केला नाही. १९८५ च्या अगोदर दंगलीचे शहर म्हणून संगमनेरची (Sangamaner) ओळख होती. मात्र, मी आमदार झाल्यानंतर कधीही ते घडलं नाही. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन पुढे गेलो आणि दंगलीचे शहर ही प्रतिमा पुसली. मग विरोधकांना हे का दिसत नाही? माझी मुस्लिम धार्जिणा म्हणून प्रतिमा बनवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. मात्र मी गणपतीची आरती केली. सप्ताहाला देखील गेलो आणि सगळ्या समाजाला घेऊन पुढे चाललो. हे का नाही दिसले? माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न केवळ राजकारणासाठी केला जातोय. काही बाहेरच्या मंडळींचा संगमनेर तालुक्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता. संकटे आली तरी घाबरायचे नाही. स्वातंत्र्यसैनिकाचा (Freedom Fighter) मुलगा आहे. जनता आपल्यासोबत असल्याने आपण लढणार आहोत, असे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी’-रोहित पवार

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की,

यशोधन संपर्क कार्यालयाजवळील मैदानावर झालेल्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, हिरालाल पगडाल, वसीम भाई आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, तालुक्यातील जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले. ४० वर्ष या विभागाचे नेतृत्व करताना अविश्रांत काम केले. मोठ्या कष्टातून तालुका उभा केला. दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका असा लौकिक देशात पोहोचविला. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला. तालुक्यातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण केले. कधीही कोणाला त्रास दिला नाही. कधी चुकीचा शब्द बोललो नाही. कुणाचे मन दुखवले नाही. आपला सहकार चांगला आहे. बाजारपेठ चांगली आहे. शेती समृद्ध झाली आहे. बायपास, हॅपी हायवे, सह बसस्थानक, शहरातील भव्यदिव्य इमारती आणि निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन असे अनेक मोठमोठे प्रकल्प आपण राबवले आहे.

अवश्य वाचा : अवैध दारू विरोधात महिला आक्रमक; दुकान पेटवले

काम केले त्याबद्दलची कृतज्ञता सर्वांनी ठेवली पाहिजे (Balasaheb Thorat)

सत्तेचा गैरवापर करून तालुक्यातील आपल्या अनेक कार्यकर्त्यांवर त्यांनी खोट्या केसेस टाकल्या. अनेकांच्या प्रपंचात माती कालवली. हे सर्व थांबवण्यासाठी आपण शिर्डी मतदारसंघात जाऊन लढा दिला. यापुढेही आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन लढायचे आहे असे ते म्हणाले. माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत सेवाभावीपणे काम करून तालुका उभा केला. भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी मिळवले. निळवंडे धरण व कालवे निर्माण केले. देशासाठी आदर्शवत सहकार निर्माण केला. गावागावात विकासाची कामे केली. मंत्रिपदाच्या माध्यमातून संगमनेरचा लौकिक राज्यभर वाढवला. यावेळी दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर यांसह तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.