Balasaheb Thorat : सर्वांना हक्काचे पाणी मिळेल, हा विश्वास निर्माण करा: थोरात

Balasaheb Thorat : सर्वांना हक्काचे पाणी मिळेल, हा विश्वास निर्माण करा: थोरात

0
Balasaheb Thorat : सर्वांना हक्काचे पाणी मिळेल, हा विश्वास निर्माण करा: थोरात
Balasaheb Thorat : सर्वांना हक्काचे पाणी मिळेल, हा विश्वास निर्माण करा: थोरात

Balasaheb Thorat : संगमनेर : निळवंडे कालव्यातून (Nilwande Dam) शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात वादाचा कोणताही विषय नाही. लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, ही पाटबंधारे विभागाची (Irrigation Department) जबाबदारी आहे. त्याबाबतीत वेळापत्रक तयार करणे, ते योग्यरीत्या पाळले जाईल याचा विश्वास लोकांना देणे, ही भूमिका पाटबंधारे विभागाने घ्यायला हवी. हा विषय राहुरी किंवा राहत्याला जाणाऱ्या पाण्याच्या बाबतीत नाही, ज्याचा हक्क आहे त्याला पाणी मिळालेच पाहिजे, यामध्ये पाटबंधारे विभागाचा संवाद कुठेतरी कमी पडतो आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, चर्चेतून मार्ग निघेल, असे मत ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले.

बारावीचा निकाल जाहीर;यंदाही मुलींनीच मारली बाजी,राज्याचा निकाल ९१.८८ टक्के

बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

ज्याच्या त्याच्या हक्काचे पाणी ज्याचे त्याला मिळाले पाहिजे. याबाबतीत कोणतीही शंका नाही. मात्र, याबाबतीत कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे संगमनेर तालुक्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आपल्याला फसवले जात आहे, ही भावना वाढल्यामुळे शेतकरी पाईप टाकून पाणी घेत आहे. अशावेळी त्यांच्याशी चर्चा करायला हवी, चर्चा करून हा प्रश्न मिटविला पाहिजे आणि त्यांना विश्वास दिला पाहिजे की तुमच्या हक्काचे पाणी तुम्हाला मिळेल. मात्र, असे होताना दिसत नाही, याउलट शेतकऱ्यांचे पाईप फोडले जात आहे. त्यांचे नुकसान केले जात आहे. म्हणून लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहे.

संतोष देशमुखांच्या लेकीचं बारावीच्या परीक्षेत यश;वैभवी देशमुखला किती टक्के?

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, (Balasaheb Thorat)

सरळ वागून व सहकार्य करूनही आपल्याला हक्काचे पाणी मिळत नाही, म्हणून जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला व त्यातून त्यांच्या भावना तीव्र झाल्या असे माझे स्पष्ट मत आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा झालेला संताप जलसंपदा विभागाने समजून घ्यायला हवा, या अगोदर दोन वेळा प्रशासनाने शेतकऱ्यांना शब्द दिला मात्र त्याचे पालन केले नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. हा वाद राहुरी, राहाता आणि संगमनेर असा नाही, कोणीही त्याला तसे स्वरूप देण्याचा प्रयत्न करू नये. राहुरी तालुक्यातील लोकही आपलेच आहे. त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे. मात्र, त्याचबरोबर, संगमनेर तालुक्यावरही अन्याय होता कामा नये.