Balasaheb Thorat : गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागील खरे सूत्रधार ओळखा : थोरात

Balasaheb Thorat : गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागील खरे सूत्रधार ओळखा : थोरात

0
Balasaheb Thorat : गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागील खरे सूत्रधार ओळखा : थोरात
Balasaheb Thorat : गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागील खरे सूत्रधार ओळखा : थोरात

Balasaheb Thorat : संगमनेर : संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) अध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये (Sangamner) विविध पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष व शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र निषेध केला. हा भ्याड हल्ला करणारा काटे हा मुखवटा असून त्या मागील खरे सूत्रधार ओळखा असे आवाहन करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे.

नक्की वाचा : आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध

संगमनेर बसस्थानक येथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ छात्र भारती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बहुजन विकास मंच, गाथा परिवार या विविध पुरोगामी संघटनांसह काँग्रेस, शिवसेना, रिपाई, यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रा. हिरालाल पगडाल, शिवसेनेचे अमर कतारी, अनिकेत घुले, ॲड. समीर लामखडे, राम अरगडे, सोमेश्वर दिवटे ,अजय फटांगरे, अर्चना बालोडे, किरण रोहम, राजा आवसक, जावेद शेख, सुरेश झावरे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. संगमनेर बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा यावेळी काढण्यात आला. या मोर्चामध्ये छात्र भारती व राष्ट्रसेवा दलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अवश्य वाचा : जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; मनोज कोतकर विरोधात गुन्हा

याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले, (Balasaheb Thorat)

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे. मराठा शब्द हा महाराष्ट्रातील सर्वांसाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार ते सांगत होते. मात्र, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पक्षांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. पुरोगामी विचार सांगणारे दाभोळकर, पानसरे यांची हत्या करणाऱ्यांचा शोध लागत नाही. बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण परभणीतील सोनवणे यांचा मृत्यू हे सर्व घडत असताना विधानसभेच्या परिसरामध्ये मारामारी होते, हे अत्यंत निंदनीय आहे.