Balasaheb Thorat : संगमनेर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळावा, याकरता यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी सुरू केलेली बाजार समिती ही संकल्पना संपूर्ण देशात राबवली गेली. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने (Sangamner Agricultural Produce Market Committee) शेतकरी, व्यापारी या सर्वांना अत्यंत चांगल्या सुविधा देताना जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याबरोबर राज्यात अग्रक्रम मिळवला असल्याचे गौरवोदगार माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काढले.
नक्की वाचा: नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन
बाजार समितीची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
कारखाना कार्यस्थळ येथे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती शंकर पाटील खेमनर होते. तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, ॲड.माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, पांडुरंग घुले, लक्ष्मण कुटे, सुधाकर जोशी, संपत डोंगरे, रामहरी कातोरे, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, सुनील कडलग, संचालक कैलासराव पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कानोरे, सतीश खताळ, दिपाली वर्पे, अनिल घुगे, सखाराम शरमाळे, निलेश कडलग, मनसुख भंडारी, निसार शेख,सचिन करपे, सचिव सतीश गुंजाळ आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार: खासदार लंके
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, (Balasaheb Thorat)
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, व्यापाऱ्यांना चांगली सुविधा मिळावी व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळावा म्हणून मध्यस्थीची भूमिका असणारी बाजार समिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केली. ही कल्पना पुढे देशभर राबवली गेली. संगमनेर तालुक्याच्या बाजार समितीने कायम शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत.
वडगाव पान, साकुर, आंबी दुमाला, निमोन येथे उपबाजार निर्माण केले आहेत. आधुनिक सुविधा पुरवल्या आहेत. शेतकऱ्यांनी यापुढे आपला शेतमाल हा बाजार समितीत विकावा, असे आवाहन करताना केंद्र सरकारने मागील वर्षी तीन काळे कायदे केले, या कायद्याविरोधात उत्तर भारतात मोठे आंदोलन झाले म्हणून ते कायदे रद्द केले. अन्यथा बाजार समित्या रद्द झाल्या असत्या. असे सांगताना बाजार समिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगले काम केले असून जिल्ह्यात प्रथम व राज्यात आपला मोठा लौकिक निर्माण केला असल्याचे ते म्हणाले. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, शेतमाल उत्पादक, व्यापारी, आडतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेच्या नोटीसचे वाचन सचिव सतीश गुंजाळ यांनी केले तर अनिल घुगे यांनी आभार मानले.