Balasaheb Thorat | पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला – बाळासाहेब थोरात 

0

Balasaheb Thorat | संगमनेर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी नाशिक – पुणे रेल्वे प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्याचे कळाले. आम्हाला आनंदच आहे; मात्र त्यांनी तीन पैकी नेमक्या कोणत्या रेल्वे मार्गाचा नकाशा मंत्री महोदयांना दाखविला, हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे, अशा खोचक टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला.

हे वाचा – हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला प्रत्युत्तर; संघ विचाराचे लोक इंग्रजांची गुलामी आणि हेरगिरी करत होते

प्रकल्पाची गती थांबली

संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना थोरात यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला विशेषतः २०२०२ नंतर गती देण्यात आली. फेब्रुवारी २०२० मध्ये सेंट्रल रेल्वेकडून डीपीआर मंजूर झाला होता. त्यानुसार नाशिक – सिन्नर – संगमनेर – साकूर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरुनगर – चाकण – आळंदी – हडपसर – पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या संदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या, मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली होती. ही संपूर्ण प्रक्रिया माझ्या उपस्थितीत आणि साक्षीने झालेली आहे. सरकारने साडेतीनशे कोटी रुपये मोघम वाटले का ? जेव्हा रेल्वेचे मार्ग तयार होत होते, तेव्हा या सर्व अडचणींचा सारासार विचार झालेला होता. त्यातून व्यवस्थित मार्गही काढलेले होते. मग अचानक सरकार बदलल्यानंतर जीएमआरटी का आठवली? मार्गात बदल करण्याचे खरे कारण नेमके काय, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. आज जी कारणे सांगितली जात आहेत, त्या कारणांचा विचार केल्यानंतरच सेंट्रल रेल्वेने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली होती. त्यातूनच नाशिक – पुणे रेल्वे सरळ मार्गे होणार होती.

अवश्य वाचा – हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला प्रत्युत्तर; संघ विचाराचे लोक इंग्रजांची गुलामी आणि हेरगिरी करत होते

पालकमंत्री रेल्वेमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री रेल्वेमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले जात आहे. पण त्यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आणि कोणता मार्ग सुचवला? आत्ता आपल्यासमोर तीन मार्ग आहेत. दोन मार्ग संगमनेर आणि अकोले तालुका येथील आहेत, तर तिसरा मार्ग शिर्डीवरून आहे. पालकमंत्र्यांनी नेमक्या कोणत्या मार्गाचा नकाशा रेल्वेमंत्र्यांसमोर ठेवला आणि चर्चा केली, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. ते नेमक्या कोणत्या मार्गाचा पाठपुरावा करत आहेत, त्याचा नकाशा संगमनेर तालुक्यातील जनतेला द्यावा, जेणेकरून जनतेच्या मनातील संभ्रम दूर होतील. संगमनेरची रेल्वे ही येथील जनतेच्या अस्मितेचा मुद्दा आहे. आज निर्णय झाला नाही तर पुढील ५० वर्षे हा प्रकल्प होणार नाही; त्यामुळे मार्गाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे थोरात यांनी ठणकावून सांगितले.

हे पहा – डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय! थान्या नाथन नेमक्या कोण ?

मुंबई – नाशिक – पुणे हा गोल्डन ट्रँगल आहे. सर्वात जास्त उद्योग, रोजगार आणि लोकसंख्या असलेला हा भाग आहे. नाशिक आणि पुणे थेट रेल्वेने जोडणे ही इथल्या व्यापाराची, शेतीची आणि समाजाचीही गरज आहे. सरळ मार्ग तयार करण्याऐवजी वाकडी वाट इथल्या विकासाला परवडणारी नाही.

बाळासाहेब थोरात
ज्येष्ठ नेते, काँग्रेस

रेल्वेच्या विषयावरून राजकारण करण्याची वेळ नाही. सर्वांनाच माहिती आहे की रेल्वे आत्ता झाली तरच होईल; नाहीतर पुढे 100 वर्षे ती होईल की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे राजकारण करण्याची ही वेळ नाही आणि हा विषयही राजकारणाचा नसून या परिसराच्या भविष्याचा विषय आहे.

बाळासाहेब थोरात
ज्येष्ठ नेते, काँग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here