Balasaheb Thorat : संगमनेर : जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्ट चांगले माहीत असतात. ऋतुजा गायकवाड आणि धनंजय दिघे यांनी यूपीएससी (UPSC) तर विश्वनाथ सांगळे यांनी एमपीएससी (MPSC) परीक्षेत मिळवलेले यश हे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तीदायी असून या विद्यार्थ्यांनी तालुक्याचा लौकिक वाढवला असल्याचे गौरवोदगार माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काढले आहेत.
नक्की वाचा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यूपीएससीतील यश प्रेरणादायी : अमोल खताळ
बाळासाहेब थोरात म्हणाले की
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तालुक्यातील तीन मुलांनी मोठे यश मिळवले आहे ऋतुजा गायकवाड हिने यूपीएससी परीक्षेत 106 वा क्रमांक मिळून आयएएस होण्याचा मान मिळवला तर धनंजय दिघे यांनी यूपीएससी मधून आयपीएस होण्याचा मान मिळवला तर सोनेवाडी येथील विश्वनाथ लहानू सांगळे हा पीएसआय झाला हे सर्व विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवायची सवय असते. ते अडचणी मधून मार्ग काढतात. कारण ग्रामीण शिक्षण हे त्यांच्यासाठी विद्यापीठ सारखे आहे. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
अवश्य वाचा : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर; लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन
हे यश तालुक्यातील नवीन पिढीसाठी प्रेरणादायी (Balasaheb Thorat)
ते पुढे बोलताना म्हणाले की, या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे तालुक्यातील नवीन पिढीसाठी प्रेरणादायी असून इतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण करावे याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्यांचे कुटुंबीय मार्गदर्शक म्हणून उभे राहिले आणि त्यामुळे यांनी यश मिळवले. यश तर मोठे आहेच पण कामही मोठे आहे आगामी काळात प्रामाणिकपणा कायद्याचे ज्ञान घेऊन निर्णयक्षमता वाढवत प्रलोभने टाळावी व तालुक्याचा लौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित अधिकाऱ्यांना केले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
विद्यार्थी मोठ्या पदावर काम करतात हे तालुक्यासाठी अभिमानास्पद
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, यूपीएससी, एमपीएससी या परीक्षा अवघड आहेत स्पर्धा मोठी आहे परंतु एकाग्रतेने आणि निष्ठा ठेवून काम केल्याने यश मिळते. प्रत्येकाने विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवताना ज्यांनी यापूर्वी या क्षेत्रात यश मिळवले त्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या पदावर काम करतात हे आपल्या तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे संगमनेर तालुक्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चांगली संस्कृती असून त्याचा लाभ नवीन पिढीला होत आहे.
शिक्षणाकरता मुलींच्या पाठीशी आई-वडिलांनी ठाम उभे राहिले पाहिजे
तर डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, मुलींच्या पाठीशी शिक्षणाकरता आई-वडिलांनी ठाम उभे राहिले पाहिजे. मुली सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे ऋतुजा हिने मिळवलेले यश हे मुलींसाठी प्रेरणादायी असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील महिलांसाठी ही भेट दिली आहे. मुली मोठे यश मिळवू शकतात त्यांना पाठिंबा द्या असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी आयएएस झालेली ऋतुजा गायकवाड, आयपीएस झालेला धनंजय दिघे आणि पीएसआय झालेला विश्वनाथ सांगळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सोनेवाडी व जोर्वे येथे मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
तिरंगा चौक येथील ऋतुजा गायकवाड आयएएस, जोर्वे येथील धनंजय संजय दिघे आयपीएस तर सोनेवाडी येथे विश्वनाथ लहानु सांगळे पीएसआय झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अशोकराव गायकवाड, संगीता गायकवाड, उत्तमराव गायकवाड, बाजीराव गायकवाड, संजय दिघे, लक्ष्मण गायकवाड ,बाबासाहेब गायकवाड, प्रा गुलाबराव गायकवाड, सखाराम माळी, माधव हसे , शिवाजी दुशिंग, अण्णा कांदळकर, रामनाथ कारले, प्रा मनीषा तुपे आदींसह जोर्वे येथील व सोनेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



