Balasaheb Thorat : शेतकऱ्यांनी उसाची एकरी उत्पादकता वाढवावी : थोरात

Balasaheb Thorat : शेतकऱ्यांनी उसाची एकरी उत्पादकता वाढवावी : थोरात

0
Balasaheb Thorat : शेतकऱ्यांनी उसाची एकरी उत्पादकता वाढवावी : थोरात
Balasaheb Thorat : शेतकऱ्यांनी उसाची एकरी उत्पादकता वाढवावी : थोरात

Balasaheb Thorat : संगमनेर : राज्यामध्ये अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. सर्वत्र स्पर्धा सुरू झाली आहे. अशा काळात आपल्या कारखान्याने कायम चांगला भाव दिला आहे. कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस (Sugarcane) लागवडी बरोबर एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. एकरी उत्पादन वाढीमध्ये हुमणी अळीसारख्या अनेक अडचणी आहेत. हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॉम्बो ट्रॅप (Combo Trap) चा वापर प्रभावी ठरेल असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. त्याचबरोबर विषमुक्त शेती गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अवश्य वाचा : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात

कॉम्बो ट्रॅपच्या किटचे वितरण

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भारतीय कृषी संशोधन परिषद व ऊस संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हुमणी आळी नियंत्रणासाठी कॉम्बो ट्रॅप चा वापर याबाबतच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय ऊस संशोधन संस्थेच्या वतीने तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना कॉम्बो ट्रॅपच्या किटचे वितरण करण्यात आले. याचबरोबर बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दोन्ही संस्थांच्या संयुक्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

थोरात म्हणाले की (Balasaheb Thorat)

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. विविध विद्यापीठ मधून होणारे संशोधन या संस्थेमध्ये जातात. त्या माध्यमातून नवनवीन संशोधन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होते. ऊस व दूध हे शाश्वत उत्पादन देणारे आहे. थोरात कारखाना व दूध संघाने कायम चांगला भाव दिला आहे.

निळवंडेच्या पाण्यामुळे वाढणार ऊस क्षेत्र

निळवंडेच्या पाण्यामुळे ऊस क्षेत्र वाढणार आहे. शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढवले पाहिजे. याकरता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. या ऊस उत्पादकता वाढीमध्ये हुमणी आळी यासारखे मोठे अडथळे आहेत. विविध फवारणीमुळे मित्र कीड मारली जाते. मात्र हुमणी आळी जमिनीखाली राहते. म्हणून कॉम्बो ट्रॅप मुळे हुमणी आळी यंत्रणात येण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

शहरांमध्ये ग्रामीण भागापेक्षा जास्त पक्षी

विविध कीटकनाशकांमुळे मित्र कीड मारली जात असल्याने त्यावर जगणारे पक्षी कमी झाले आहेत. अनेक शहरांमध्ये ग्रामीण भागापेक्षा जास्त पक्षी आहेत. यापुढील काळात विषमुक्त अन्नासाठी विषमुक्त शेती गरजेची असल्याचे ते म्हणाले.तर डॉ. योगेश थोरात म्हणाले की, हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा ऊस, नारळ, डाळिंब या पिकांवरही होत आहे. मुरबाड जमीन, शेतीलगत बोर,निंब,बाभळ अशी झाडे असणे यामुळे ही अळी वाढते. या अळीचे एकत्रितपणे नियंत्रण केले पाहिजे. उन्हाळ्यामध्ये या अळीचे भुंगेरे बाहेर येतात. कॉम्बो ट्रॅप मुळे या भुंगेऱ्यांना रात्री एकत्र गोळा करता येणार आहे. 

जैविक कीटनाशकांचा वापर करावा

या सर्व भुंगेऱ्यांना नंतर जमिनीत काढून टाकून त्याचे खत सुद्धा होऊ शकते. जमिनीची नांगरट दिवसा केली तर अनेक पक्षी येऊन जमिनीतील कीटक खातात. मात्र सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीची रात्रीची नांगरट करतात. त्यामुळे पक्षी रात्री कीटक खाण्यासाठी येत नाहीत आणि त्यातून हे हुमणी अळीचे कीटक वाढत जातात. कॉम्बो ट्रॅप च्या वापरा बरोबरच अधिक हुमणी अळी झाल्यास जैविक कीनाशकांचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. याचबरोबर कॉम्बो ट्रॅप द्वारे हुमणी अळी पकडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.