Balasaheb Thorat : थोरातांना दुसऱ्यांचीच तळी उचलण्यात धन्यता; मंत्री विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला

Balasaheb Thorat : थोरातांना दुसऱ्यांचीच तळी उचलण्यात धन्यता; मंत्री विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला

0
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : थोरातांना दुसऱ्यांचीच तळी उचलण्यात धन्यता; मंत्री विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला

Balasaheb Thorat : नगर :  ”बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी थोडी तरी लाज बाळगली पाहिजे. ते स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात. मात्र, आपल्या जिल्ह्यामध्ये ते काँग्रेससाठी (Congress) एकही जागा घेऊ शकले नाहीत. दुसऱ्यांची तळी उचलण्यामध्ये ते धन्यता मानतात. त्यामुळे त्यांची वैचारिक दिवाळखोरी यामधून सिद्ध होते. त्यांनी मदत केल्यामुळे नगर दक्षिणची जागा येईल, अशा या भ्रामक कल्पना आहेत. त्या तिघांनी भविष्यात स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करायला सुरूवात केली पाहिजे”, अशा खोचक शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

हे देखील वाचा: शिक्षक मतदारसंघात रंगणार विखे-कोल्हे संघर्ष; राजेंद्र विखे पाटील दाखल करणार आज उमेदवारी अर्ज

एक्झिट पोलवर नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया

लाेकसभा निवडणुकासाठी १३ मे राेजी मतदान प्रक्रिया पार पडली. आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा एनडीएचं सरकार सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे भाजपा पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीही सत्ता स्थापन करेल, असा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात ४ जून रोजी चित्र स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलवर नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 

Balasaheb-Thorat
Balasaheb-Thorat

नक्की वाचा: नगर, शिर्डी लाेकसभा काेण जिंकणार? एक्झिट पोलने काय वर्तविले भाकीत?

एक्झिट पोलसंदर्भात मंत्री विखे पाटील म्हणाले (Balasaheb Thorat)

“एक्झिट पोलसंदर्भात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, ”महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळेल. एक्झिट पोल आल्यानंतर राजकीय विश्लेषक विश्लेषण करत असतात. या सर्वांना ४ जूनला उत्तर मिळेल. आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही जिंकणार हा विश्वास आम्हाला पहिल्यापासून होता. थोडा सोशल मीडियाचा परिणाम होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून विष पेरण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेचा कामावर विश्वास आहे. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वनेते आहेत. त्यांचा आशीर्वाद डॉ. सुजय विखे यांना होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचंही मार्गदर्शन आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here