Balasaheb Thorat : बाळासाहेब थाेरातांनी नगर शहरातून विधानसभा लढवावी; आम्ही जीवाचे रान करू ः दीप चव्हाण

Balasaheb Thorat : बाळासाहेब थाेरातांनी नगर शहरातून विधानसभा लढवावी; आम्ही जीवाचे रान करू ः दीप चव्हाण

0
Balasaheb Thorat : बाळासाहेब थाेरातांनी नगर शहरातून विधानसभा लढवावी; आम्ही जीवाचे रान करू ः दीप चव्हाण
Balasaheb Thorat : बाळासाहेब थाेरातांनी नगर शहरातून विधानसभा लढवावी; आम्ही जीवाचे रान करू ः दीप चव्हाण

Balasaheb Thorat : नगर : नगर शहराला (Nagar City) विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नगर शहरातून विधानसभा लढवून आमदार व्हावे, अशी अपेक्षा काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा : राहुल झावरेंवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीतही मोठा उलटफेर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदार संघात जो निकाल लागला. त्यावरून विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे मोठा उलटफेर होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. नगरकरांनी फसवा विकास दाखवणाऱ्या विद्यमान खासदाराला एकमतानं हरवले. त्यानंतर आता नगर शहर विधानसभा मतदारसंघात शहराच्या सर्वांगीण विकासाची जाण असलेले नेतृत्व मिळावे, अशी नगरकरांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने दीप चव्हाण यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाला सर्वांनी मान्यता द्यावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे म्हटले आहे.

अवश्य वाचा : पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वातावरण तापलं ;आज ‘या’ ठिकाणी बंदची हाक

शरद पवार व उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळासह भेट घेणार (Balasaheb Thorat)

या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळासह भेट घेणार आहेत. नगर शहराची जागा काँग्रेस पक्षाला सोडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी चव्हाण हे सर्वांना गळ घालणार आहेत.  

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat


एकेकाळी नगर जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. दादा कळमकर, माजी राज्यमंत्री असेरी, शिवाजी नागवडे, राजीव राजळे, बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकाळात नगर जिल्ह्यासह राज्यात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. आपापली शहरे विकसित केली. संगमनेर शहरासह तालुका, तर विकासाच्या प्रगतीपथावर प्रचंड घोडदौड करतो आहे. हरितक्रांती, धवलक्रांती, औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांतीचे नगर जिल्ह्याचे मूळ उगमस्थान ते बनले आहे. बाळासाहेब थाेरातांनी अनेक संस्था उभारून संगमनेर तालुक्याचा चाैफेर विकास केला आहे.

 
 आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात त्यांच्या रूपाने संगमनेरला थोरातांचे उत्तरदायित्व या आमदारकीच्या निवडणुकीत मिळावे, थोरातांनी नगरमधून निवडणूक लढवावी, म्हणजे नगर शहराचा संगमनेरप्रमाणे शाश्वत विकास होईल. नगरकरांच्या भल्यासाठी थोरातांना उमेदवारी मिळावी, अशी विनंती चव्हाण हे वरिष्ठांना करणार आहेत. याबाबत नगर जिल्ह्यातील काँग्रेस नेते मंडळी आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here