Balasaheb Thorat : माझ्या विजयात कृष्णाची भुमिका निभावलेले थोरातच खरे खासदार : लंके

Balasaheb Thorat : माझ्या विजयात कृष्णाची भुमिका निभावलेले थोरातच खरे खासदार : लंके

0
Balasaheb Thorat : माझ्या विजयात कृष्णाची भुमिका निभावलेले थोरातच खरे खासदार : लंके
Balasaheb Thorat : माझ्या विजयात कृष्णाची भुमिका निभावलेले थोरातच खरे खासदार : लंके

Balasaheb Thorat : संगमनेर: या लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections) मला नगर दक्षिणेची उमेदवारी देण्यात आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी पडद्याआडची कृष्ण म्हणून निभावलेली खरी भूमिका मला निवडणूकीनंतर समजली. एवढ्या मोठ्या यंत्रणेच्या विरोधात किंगमेकर होणे सोपे नव्हते. निलेश लंके (Nilesh Lanke) फार छोटा माणूस आहे, खरे जायंट किलर तर थोरात साहेब आहेत, अशा शब्दात नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आमदार थोरातांचे ऋण व्यक्त केले. संगमनेर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

खासदार लंके म्हणाले

खरे तर या निवडणूकीत आम्ही फक्त स्क्रिनवरचे खेळाडू होतो. माझा रिमोट थोरात साहेबांकडे होता. माझा खांदा पक्का असल्याचे माहित असल्याने त्यांनी माझ्या खांद्यावर धनुष्य ठेवून करेक्ट निशाणा साधला. त्यामुळे बलाढ्य शक्तीपुढे आम जनतेची शक्ती विजयी झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि इथे झालेल्या घोषणा खऱ्या करीत थोरात साहेब मुख्यमंत्री होणार आहेत. आमची विचार करण्याची पातळी संपायची तेथे त्यांची सुरु व्हायची. बाजीप्रभूप्रमाणे मी थोरात साहेबांच्या शब्दांवर नगर दक्षिणेची खिंड लढवली. खरे खासदार थोरात साहेब आहेत.

अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, (Balasaheb Thorat)

धनदांडगे व प्रस्थापितांविरोधातील मोठी लढाई लंके यांनी जिंकली आहे. कोरोना काळातील चांगल्या कामामुळे लंके यांना जनतेने स्वीकारल्याचे पाहून, त्यांच्याविरोधात खोट्या केसेस सुरु झाल्या. त्यांच्या खासदारकीच्या मार्गात अडथळे उभारण्यात आले. सत्तेचा गैरवापर झाला. कुटील कारस्थानाच्या विरोधातील ही लढाई सोपी नव्हती, दोन महिने नियोजन करावे लागले. संवाद यात्रेत रात्री उशिरापर्यंत लोक जागे असत. पवार साहेबांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत. राष्ट्रवादी व आमच्याही चांगल्या जागा आल्या. आरोग्याचा प्रश्न असतानाही पवार साहेब श्रीगोंद्याच्या सभेला आले. भाजपाच्या अनेक जणांनी अप्रत्यक्षपणे मदत केली. आता लढाई विधानसभेची आहे. संगमनेर, अकोले व राहात्याच्या कार्यकर्त्यानी चांगले काम केले. विधानसभेच्या वेळी एकमेकांना साथ देऊन सहकार्य केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here