Balasaheb Vikhe Patil : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी

Balasaheb Vikhe Patil : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी

0
Balasaheb Vikhe Patil : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी
Balasaheb Vikhe Patil : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी

Balasaheb Vikhe Patil : संगमनेर : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांच्‍या विचाराला संगमनेर (Sangamner) तालुक्‍याने नेहमीच साथ दिली. त्‍यांच्‍या आठवणींना उजाळा देण्‍यासाठी पिंपळगाव कोंझीरा गावाने त्‍यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह हे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल, असे भावनिक उदगार महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काढले.

Balasaheb Vikhe Patil : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी
Balasaheb Vikhe Patil : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी

नक्की वाचा: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय

स्‍थानिक ग्रामस्‍थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित

पिंपळगाव कोंझीरा येथे उभारण्‍यात आलेल्‍या सभागृहास लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील असे नाव देण्‍यात आले असून, सभागृहातील तैलचित्राचे अनावरण मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. याप्रसंगी स्‍थानिक ग्रामस्‍थ आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. स्‍व.अशोकराव मोरे यांच्‍या स्‍मृतीस्‍थळावर पुष्‍पाजंली अर्पण करुन मंत्री विखे पाटील यांनी अभिवादन केले.

Balasaheb Vikhe Patil : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी
Balasaheb Vikhe Patil : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी

अवश्य वाचा: खड्डे मुक्त शहराची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे : संग्राम जगताप

मंत्री विखे पाटील म्‍हणाले (Balasaheb Vikhe Patil)

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी विचारांच्‍या आ‍धारावर कार्यकर्त्‍यांचा समुह जमा केला होता. शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांबरोबरच हक्‍काच्‍या पाण्‍यासाठी त्‍यांनी उभा केलेला संघर्ष हा काळाच्‍या ओघात देशाच्‍या धोरणामध्‍ये रुपांतरीत झाला. कॉम्रेड सहाणे मास्‍तरांसारख्‍या असंख्‍य कार्यकर्त्‍यांनी त्‍यांना सदैव साथ दिली. या सर्व वाटचालीत काही तरुण कार्यकर्तेही जोडले गेले. यामुळेच विचाराला साथ देणाऱ्या कार्यकर्त्‍यांची फळी आजही टिकून राहीली याचा निश्चित अभिमान वाटतो. याच परिसरात निळवंडे कालव्‍यावर उभारण्‍यात आलेल्‍या पुलाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थि‍तीत करण्‍यात आले. मागणीपुर्वीच या पुलाचे काम पुर्ण करण्‍याच्‍या सुचना आपण जलसंपदा विभागाला दिल्‍या होत्‍या. अतिशय कमी कालावधीत या पुलाचे काम मार्गी लागले असून, या भागातील दळणवळणासाठी या जलसेतूचा निश्चित उपयोग होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here