Balochistan : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India-Pakistan War) हा तणाव वाढला आहे. असे असताना दुसरीकडे स्वतंत्र बलुचिस्तानसाठी (Balochistan) मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. बलोच लिबरेशन आर्मीने (Baloch Liberation Army) पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना क्वेट्टा सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर आता बलोच लिबरेशन आर्मीने स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे.
नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा
भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दणका दिल्यानंतर आता बलुचिस्तानध्येही त्याचे पडसाद दिसून येत आहेत. एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना दुसरीकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करत पाकिस्तानपासून स्वातंत्र झाल्याची घोषणा केली आहे.
अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?
मीर यार बलोच यांची मागणी (Balochistan)
मीर यार बलोच यांनी अशीही मागणी केली आहे की भारताने नवी दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करावे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांती सेना ही बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या सीमेत धाडावे अशी मागणीही त्याने केली आहे.