Balrangbhumi Parishad : बालरंगभूमी परिषद, मुंबईच्या प्रमुख कार्यवाहपदी नगरचे सतीश लोटके; अनंत जोशी कार्यकारी समिती सदस्य

Balrangbhumi Parishad : बालरंगभूमी परिषद, मुंबईच्या प्रमुख कार्यवाहपदी नगरचे सतीश लोटके; अनंत जोशी कार्यकारी समिती सदस्य

0
Balrangbhumi Parishad
xr:d:DAF5Y3epXKI:881,j:110762010904899776,t:24040414

Balrangbhumi Parishad : : नगर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) घटक संस्था ‘बालरंगभूमी परिषद’ (Balrangbhumi Parishad) मुंबईची सर्वसाधारण सभा पुणे येथे झाली. सभेने सन २०२४-२९ साठी एकमताने कार्यकारी मंडळाची निवड करत अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांची अध्यक्षपदी तर राजीव तुलालवार कार्याध्यक्ष, सतीश लोटके प्रमुख कार्यवाह, उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर, दीपक रेगे कोषाध्यक्ष, असिफ अन्सारी व दीपाली शेळके सहकार्यवाह या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

हे देखील वाचा: ज्यांनी दादांची साथ सोडली, ते जनतेची साथ काय देणार; राधाकृष्ण विखेंची लंकेंवर टीका

१७ कार्यकारी सदस्यांची एकमताने निवड (Balrangbhumi Parishad)

कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून ॲड. शैलेश गोजमगुंडे – लातूर, आनंद खरबस – सोलापूर, वैदेही चवरे – सोईतकर- नागपूर, अनंत जोशी – नगर , आनंद जाधव – नाशिक , योगेश शुक्ल – जळगाव, धनंजय जोशी- सांगली, त्र्यंबक वडसकर – परभणी, नंदकिशोर जुवेकर – रत्नागिरी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी काम पाहिले. सभेत माजी अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या मागील कार्याचा आढावा सभेपुढे मांडला. आणि पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. यात १७ कार्यकारी मंडळ सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.

नक्की वाचा: फुटबाॅल खेळ रुजवण्यासाठी गाॅडविन डिक यांचे माेलाचे याेगदान ः नरेंद्र फिराेदिया

नाट्यक्षेत्रात भरीव योगदान (Balrangbhumi Parishad)

बालरंगभूमी परिषद मुंबई चे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके हे नगरच्या नाट्यक्षेत्रात गेल्या ४० वर्षांपासून कार्य करत आहेत. अनेक नाटकांचे दिग्दर्शन व अभिनय त्यांनी केला आहे. नाट्य परिषद, मुंबईचे कोषाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. कार्यकारी मंडळ सदस्यपदी नगरचे अनंत जोशी यांची निवड झाली आहे. जोशी यांनी नाट्य आराधना या संस्थेच्या माध्यमातून नगरच्या नाट्यक्षेत्रात गेल्या ४२ वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी चित्रपट, नाटक, बालनाट्य क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here