BAN ON COW SLAUGHTER BILL : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी (Farmers), व्यापारी, कुरेशी (खाटीक) समाज आणि पशुपालकांनी गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे (BAN ON COW SLAUGHTER BILL) होणाऱ्या अडचणींविरोधात जनावरांच्या खरेदी-विक्री बाजार बंद आंदोलन सुरू केले आहे. अहिल्यानगर जमियतुल कुरेश (खाटीक संघटना) चे अध्यक्ष वाजिद अहमद आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कायद्यात (Law) सुधारणा आणि गोरक्षकांच्या अत्याचारांवर कारवाईची मागणी केली आहे.
नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या
कुरेशी समाजावर उपासमारीचे संकट
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये म्हशी, जर्सी गाय आणि भाकड जनावरांच्या खरेदी-विक्रीवर तथाकथित गोरक्षक आणि काही संघटनांकडून अत्याचार होत असल्याचा आरोप निवेदनात आहे. यामुळे शेतकरी आणि कुरेशी समाजावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. शेती, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा त्यांचा एकमेव उत्पन्नाचा स्रोत असून, कायद्यामुळे जनावरे पोसणे आणि विक्री करणे अशक्य झाले आहे.
अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार
निवेदनात म्हटले आहे की, (BAN ON COW SLAUGHTER BILL)
गोरक्षकांकडून मारहाण, लूट आणि खोटे गुन्हे दाखल केले जातात. गोशाळांमध्ये जप्त जनावरांची काळ्या बाजारात विक्री होत असून, शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांची सुटका करताना अवाजवी खर्चाला सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.