Ban on Heavy Vehicles : दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी

Ban on Heavy Vehicles : दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी

0
Ban on Heavy Vehicles : दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी
Ban on Heavy Vehicles : दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी

Ban on Heavy Vehicles : नगर : वाहतुक कोंडी (Traffic Jam), अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणारी अवजड वाहतुक (Ban on Heavy Vehicles) त्वरीत थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नियमांचे उल्लंघन करुन सर्रासपणे दिवसाढवळ्या व प्रतिबंध असलेल्या वेळेत शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवावर उठली आहे. या अवजड वाहनांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत.

नक्की वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय  

नागरिकांमधून उमटत आहे संतप्त भावना

गेल्या काही दिवसापुर्वी बालिकाश्रम रोड, सर्वोदय कॉलनी येथे शालेय विद्यार्थ्याचा अवजड वाहनामुळे दुर्दैवी अपघाती निधन झाले होते. मात्र, अद्यापि प्रशासनाने ही अवजड वाहतूक बंद केली नसल्याने नागरिकांमधून संतप्त भावना उमटत आहे.

अवश्य वाचा : “मुख्यमंत्री साहेब,आरोपींना पाठीशी घालू नका,अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”- मनोज जरांगे

बंदी असताना अवजड वाहनांची वर्दळ (Ban on Heavy Vehicles)

शहरात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे कामे सुरु असल्याने नागरिकांना दळण-वळणासाठी मुख्य रस्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरात सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ शहरातून सुरु आहे. अनेक ठिकाणी मुख्य चौकात अवजड वाहनांमुळे वाहतुक कोंडीचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शाळा भरताना व सुटताना तसेच इतर कार्यालयीन वेळेत शहरात वाहतुकीचे नियोजन नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहन शहरात येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागत आहे.