Bangladesh : नगर : बांग्लादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांगलादेशमधील हिंसाचार (Violence) सुरुच आहे. आता नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावाने अल्पसंख्याक हिंदूंसह शेख हसीनांच्या अवामी लीगच्या समर्थक आणि त्यांच्या कार्यालयांना टारगेट करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी जेसोरमध्ये या जमावाने एक हॉटेल पेटवलं. त्यात ८ जणांचा मृत्यू (Death) झाला असून ८४ जण जखमी झाले. आगीत जखमी झालेले बहुतांश जण विद्यार्थी आहेत.
नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे
५०० कैद्यांना तुरुंगातून पळवलं
काल किमान २७ जिल्ह्यांमध्ये जमावानं हिंदूंच्या घरांवर आणि दुकानांवर हल्ले केले. त्याच्या मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या. याशिवाय कालीगंज उपजिल्ह्यातील चंद्रपूर गावात चार हिंदू कुटुंबांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. यासह देशभरात संचारबंदी लागू असताना जमाव रस्त्यावर उतरला. बांगलादेशच्या शेरपूर जिल्ह्यात असलेल्या तुरुंगावर हल्ला करत आंदोलकांनी तुरुंगाचा गेट तोडून आग लावली. त्यांनी ५०० कैद्यांना तुरुंगातून पळवलं.
अवश्य वाचा: उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका
क्रिकेटपटूंचे घरही जाळले (Bangladesh)
बांगलादेशचा क्रिकेटपटू व अल्पसंख्याक हिंदू समाजातील लिटन दास आणि माजी कर्णधार मुशरफी मुर्तजा यांची घरंदेखील पेटवण्यात आली आहेत. मुर्तजा अवामी लीगचा नेता आहे. जानेवारी झालेली सार्वत्रिक निवडणूक लढवून मुर्तझा खासदार झाले. तर लिटन दास बांगलादेश क्रिकेट संघात यष्टीरक्षक आणि सलामीवीर आहे.