Bangladesh : नगर: जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात कारवाई करत जिल्हा पोलिसांनी (Police) ७ बांग्लादेशी (Bangladesh) महिला घुसखोरांना तत्काळ ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांच्या मायदेशी हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल
संबंधित महिलांकडे आढळली बांग्लादेशी कागदपत्रे
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनधिकृतरीत्या राहणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर हद्दपार कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार अहिल्यानगर तालुक्यातील रूईछत्तीशी परिसरात बांग्लादेशी महिला ताब्यात घेतल्या. चौकशीदरम्यान संबंधित महिलांकडे त्या बांग्लादेशी नागरिक असल्याची कागदपत्रे आढळून आली. त्यांनी भारतीय कायद्याचे उल्लंघन केल्याची खात्री पोलिसांना पटली.
अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…
कायदेशीररीत्या बांग्लादेशात हद्दपार (Bangladesh)
यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून न्यायालयीन खटला चालवून हद्दपारीसाठी पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागत असे. मात्र, सन २०२५ मध्ये सुधारित करण्यात आलेल्या परदेशी नागरिक कायद्यानुसार अवैधरित्या घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना तात्काळ ताब्यात घेऊन स्थानबध्द करण्याचे तसेच वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून जलदगतीने हद्दपारीचे आदेश मिळवण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक तथा परदेशी नागरिक नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अनुषंगाने जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ कार्यालय, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (कोलकाता) तसेच सीमा सुरक्षा बल (कोलकाता) यांच्याशी सातत्याने समन्वय साधून संपूर्ण हद्दपार प्रक्रियेचा पत्रव्यवहार तातडीने पूर्ण करून १३ जानेवारी २०२६ रोजी कायदेशीररीत्या त्यांना बांग्लादेशात हद्दपार केले.



