Sheikh Hasina Resignation:बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा 

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. शेख हसीना भारताच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

0
Sheikh Hasina
Sheikh Hasina

Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. त्याच पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या (Bangladesh Violance) पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनी राजीनामा (Resignation) दिला आहे. शेख हसीना यांनी राजीनामा देऊन, त्या सुरक्षित पण अज्ञात स्थळी रवाना झाल्या. शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं देश सोडला असून त्या दोघीहीदेश सोडून निघून गेल्या आहेत.

बांगलादेशात सध्या अस्थिर वातावरण आहे. मागच्या काही दिवसांपासून येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू आहे. पंतप्रधान शेख हसीना भारताच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नक्की वाचा :शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे

काय आहे नेमकं प्रकरण?(Sheikh Hasina Resignation)

बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे.

अवश्य वाचा : राज्यात पावसाचा जोर ओसरणार! पुढील पाच दिवस ‘या’ ठिकाणी अलर्ट

शेख हसीना हेलिकॉप्टरमधून रवाना (Sheikh Hasina Resignation)


बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून शेख हसीना ढाक्यामधून भारताकडे रवाना झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मोठ्या संख्येनं आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. शेख हसीना यांच्या मुलाने सुरक्षा दलांना आवाहन केलं होतं की, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सैन्याने अलर्ट राहावं. त्या पार्श्वभूमीवर ढाक्यासह देशभरात सैन्य तैनात करण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here