Bank Holidays in June 2025:जूनमध्ये तब्बल १२ दिवस बँका राहणार बंद 

0
Bank Holidays in June 2025:जूनमध्ये तब्बल १२ दिवस बँका राहणार बंद 
Bank Holidays in June 2025:जूनमध्ये तब्बल १२ दिवस बँका राहणार बंद 

नगर : मे महिना संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत.त्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुढील महिन्याचे म्हणजेच जून २०२५ चे (June 2025) बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर (Holiday calendar) जाहीर केले आहे. त्यामुळे तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर आताच त्याचे नियोजन करणे योग्य ठरेल. त्यामुळे तुम्हाला धावपळ करण्याची गरज पडणार नाही. जूनमध्ये एकूण १२ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत, ज्यात काही प्रादेशिक सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

नक्की वाचा : ‘सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर ही पदवी देऊ’;देवेंद्र फडणवीस यांची घोषणा   

बँका ‘या’ दिवशी असतील बंद (Bank Holidays in June 2025)

जून महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये बकरी ईदसारख्या महत्त्वाच्या सणासोबतच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच सर्व रविवारी बँका बंद राहतात. आरबीआयचे हे कॅलेंडर राज्यानुसार बदलू शकते. 

अवश्य वाचा : ‘अमित शहांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे मला पहा आणि फुलंं वहा’-हर्षवर्धन सपकाळ

जून २०२५ मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays in June 2025)

१ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
६ जून (शुक्रवार): ईद-उल-अधा (बकरीद) – केरळमधील कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद
७ जून (शनिवार): बकरी ईद (ईद-उल-जुहा) – देशभरातील बँका बंद.
८ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात)
११ जून (बुधवार): संत गुरु कबीर जयंती/सागा दावा – सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद.
१४ जून (शनिवार): दुसरा शनिवार (देशभरात)
१५ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात)
२२ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात)
२७ जून (शुक्रवार): रथयात्रा/कांग (रथयात्रा) – ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद
२८ जून (शनिवार): चौथा शनिवार (देशभरात)
२९ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात)
३० जून (सोमवार): रेमना नी – मिझोरममध्ये बँका बंद

सलग सुट्ट्यांची संधी (Bank Holidays in June 2025)

जूनमध्ये असलेल्या या सुट्ट्यांमध्ये ७ जून (शनिवार) रोजी बकरी ईद आहे आणि त्यानंतर ८ जून रोजी रविवार असल्याने, हा एक लाँग वीकेंड ठरणार आहे. त्यामुळे या काळात बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते आधीच करून घेणे योग्य ठरणार आहे. 

ऑनलाइन सेवा नेहमीप्रमाणे सुरू (Bank Holidays in June 2025)

बँकांना सुट्टी असली तरी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग सेवा २४ तास उपलब्ध राहतील. तसेच, रोख रकमेच्या गरजेसाठी एटीएम केंद्रे नेहमीप्रमाणे कार्यरत असतील. युपीआय आणि इतर पेमेंट ॲप्सही अखंडपणे काम करत राहतील.