Pandharpur Vitthal Mandir: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळले तळघर;मंदिराचे गूढ वाढले 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सोळखांबी परिसरात पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी हनुमान दरवाजाजवळ काम करत होते. त्यावेळी या ठिकाणी एक तळघर मिळून आले.

0
Pandharpur Vitthal Mandir
Pandharpur Vitthal Mandir

नगर : महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरचे मंदिर (Pandharpur Temple) हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या विठ्ठल मंदिराचं प्राचीन पद्धतीनं संवर्धन करण्यात येत होतं. हे काम करत असतानाच एक दगड खचला आणि त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे गूढ आणखीनच वाढलं. खचलेला दगड तिथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिला असता तिथे एक तळघरवजा खोली (Basement Room) आढळून आली. या तळघराच्या निमित्ताने काही पुरातन वारसा आणि माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये राडा;तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराला घेरलं तर एकीकडे ईव्हीएम पाण्यात  

दोन जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरु (Pandharpur Vitthal Mandir)

सध्या श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. या आराखड्यातील प्रस्तावित कामांपैकी मंदिराच्या बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी, सभामंडप व इतर ठिकाणी काम सुरू आहे. इथे चांदी हे बसवण्यात येणार आहे. १५ मार्चपासून गाभार्‍यात जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू करण्यात आली. तेव्हापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे विठ्ठलभक्तांना २ जून पासून आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या चरणांना पुन्हा स्पर्श करता येईल.

अवश्य वाचा : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तळघरात नेमके काय ? (Pandharpur Vitthal Mandir)

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सोळखांबी परिसरात पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी हनुमान दरवाजाजवळ काम करत होते. त्यावेळी फरशीचा चूना निघाला आणि क्लिनिंग करत असताना एक दगड खचला. मात्र याठिकाणी पोकळी आढळून आली. तो दगड काढल्यानंतर या ठिकाणी एक तळघर मिळून आले. मंदिर समितीतील अधिकारी व वास्तु विशारद आबबळे यांनी याची पाहणी केले. त्यावेळी ते तळघर पाच ते दहा फूट असल्याचे दिसून आले. विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ या तळघराचा दरवाजा सापडला. या तळघरात १ विष्णूरुपी मुर्ती, १ व्यंकटेश मुर्ती, १ तुळजा भवानी मुर्ती, इतर ३ दगडी मुर्ती, बांगड्यांचे तुकडे, पादुका आणि जुनी नाणी आढळून आलेत. यातील दोन मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तर १ मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. या तळघरात ६ बाय ६ फुटाचे चेंबर असून ये हे तळघर आतून बंदिस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंढरपूरचे विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे खूप जूने, ऐतिहासिक, धार्मिक आणि पुरातत्वीय महत्व असणारे मंदिर आहे. मात्र, यामध्ये काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे अनेक बदल झाले होते. याच मंदिराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामुळे जीर्णोध्दारानंतर नव्याने तयार झालेले मंदिर भाविकांना ७०० वर्ष मागे घेऊन जाऊन पुरातन मंदिराचा अनुभव देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here