BBC News Marathi : विद्यार्थ्यांनी साधला बीबीसी मराठीच्या संपादकांसोबत संवाद 

BBC News Marathi : विद्यार्थ्यांनी साधला बीबीसी मराठीच्या संपादकांसोबत संवाद 

0
BBC News Marathi : विद्यार्थ्यांनी साधला बीबीसी मराठीच्या संपादकांसोबत संवाद 
BBC News Marathi : विद्यार्थ्यांनी साधला बीबीसी मराठीच्या संपादकांसोबत संवाद 

BBC News Marathi : पारनेर : नवोदय विद्यालयात (Navodaya Vidyalaya) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच एक संपादकांशी संवाद या विषयांतर्गत पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे बीबीसी मराठीचे (BBC News Marathi) संपादक अभिजीत कांबळे (Abhijeet Kamble) यांची मुलाखत आयोजित करण्यात आली. विशेष बाब म्हणजे पत्रकारितेच्या (Journalism) क्षेत्रात दोन दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेले कांबळे हे नवोदय विद्यालयाच्या दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी आहेत.

नक्की वाचा : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक

विविध उपक्रमांमुळे आत्मविश्वास वृद्धिंगत कांबळे

विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना कांबळे यांनी सांगितले की, नवोदय विद्यालयात शिकलेला प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. मीसुद्धा पत्रकारिता या क्षेत्रात यशस्वी संपादक होण्यामागे विद्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपल्या चौफेर वाचनामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवता येते. संभाषण कौशल्य विकसित होते, लेखन कौशल्य सुधारते. नवोदय विद्यालयात होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. विविध प्रकारच्या माध्यमांमध्ये किंवा पत्रकारितेत खूप ताकद असते. त्याचा आपण समाजासाठी विधायक उपयोग करायला हवा.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री

विद्यार्थ्यांना प्रश्न पडायला हवेत (BBC News Marathi)

देशाचे नागरिक म्हणून आपण स्वायत्त संस्था, विधायिका, न्यायपालिका या सर्वांची कार्य काय हे आपण समजून घेतले पाहिजे. समाज हिताचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्न पडायला हवेत आणि ते आदरपूर्वक शिक्षकांना विचारायला हवेत. बीबीसीच्या कामाचं स्वरूप सांगताना ते म्हणाले की फोटो, व्हिडिओ, शब्दांकन, बातमीची प्रामाणिकता तपासूनच निवड करुन बातम्या प्रसारित केल्या जातात. लोकांच्या जगण्याशी संबंधित विषय लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, यासाठी बातम्या मनोरंजक कशा करता येतील यासाठी बीबीसी प्रयत्नरत आहे. पत्रकारिता या क्षेत्रात अनेक आव्हानात्मक प्रसंगांनाही सामोरे जावे लागते.

कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथी अभिजित कांबळे व अर्चना कांबळे, कपिल ठोकळ, अनील मोरे  या सर्वांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य बोरसे सर व उपप्राचार्य मुन्नरवार सर यांनी केले. संपादकांची मुलाखत विद्यालयाचे मराठी विषय शिक्षक राजाराम फंड, ग्रंथालयाचे ग्रंथपाल मदन तुपकर ,भोंडवे सर या शिक्षकांनी तसेच वैभवी बोढके, निर्झरा वाघमोडे, अविष्कार हांडे, सर्वज्ञ वनपुरे, श्रेयस पंचमुख, श्रुतिका झगडे, संचेती जगताप या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून संवाद साधत मुलाखत घेण्यात आली.