Beaten to Death : शेवगाव : मुलीशी बोलणाऱ्या युवकासह त्याच्या दोन मित्रांना, मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू (Beaten to Death) झाला. शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे तीन युवकांना मारहाण करण्यात आली होती. जखमीमधील एका युवकाने दुसऱ्या दिवशी शेवगाव पोलीस (Police) ठाण्यात संबंधितांच्या विरोधात फिर्याद (Complaint) दाखल केली होती. या घटनेतील जखमीचा अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम
लोखंडी रॉडने मारहाण
फिर्यादी व त्याचे मित्र मोटारसायकलवरून शेवगाव बसस्थानक येथे गेले होते. बसस्थानकात मुलीशी बोलण्याच्या कारणावरुन तिघा मित्रांना सुताच्या दोरीने बांधून ठेवले व लोखंडी रॉडने मारहाण केली. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे
पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात (Beaten to Death)
शवविच्छेदनानंतर त्याच्यावर सायंकाळी उशिरा त्याच्या गावी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.