Beating : नगर : राहुरी तालुक्यातील कात्रड परिसरात एका तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने जबर मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी (Serious Injuries) झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ४) रात्री नऊच्या सुमारास सुमारास घडली.
नक्की वाचा : शिक्षिका धर्मांतराबाबतचे धडे देत असल्याचा आरोप; पोलीस अधीक्षकांना निवेदन
डोक्याला पिस्तूल लावून जबर मारहाण
नितीन अशोक सरोदे (वय ३३, रा. कात्रड, ता. राहुरी. जि. अहिल्यानगर), असे जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी नितीन सरोदे यांनी सांगितले की, ते रात्री ९ वाजता दुकान बंद करून त्यांच्या घराकडे निघाले असता रस्त्यात ससे वस्ती परिसरात १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यांचे चारचाकी वाहन अडविले. त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून धनु भाऊ यांच्या वडिलांचे नाव घेतो का, असे म्हणत लाकडी दांडे, व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.
अवश्य वाचा : महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्याची चार हजार नावे; अभिषेक कळमकरांचे आयुक्तांना निवेदन
आरडाओरडा केल्याने टोळक्याने तेथून काढला पळ (Beating)
या मारहाणीत नितीन सरोदे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी आरडाओरडा केल्याने त्या टोळक्याने तेथून पळ काढला. या दरम्यान काही नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले व जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर जखमीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, याबाबत अद्याप राहुरी पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्हा दाखल नसल्याचे समजते.



