Beating : संगमनेर : शहरातील जोर्वे नाक्यानंतर आता दिल्लीनाका परिसरात एका समाजातील जमावाने तरुणाला शिवीगाळ करून मारहाण (Beating) केली. तर मारहाण सोडवण्यासाठी जे आले त्यांनाही जमावाने मारहाण केल्याने संगमनेर तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा तणावाखाली आले होते. मात्र, रात्री उशिरा त्या जमावावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस (Police) अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
नक्की वाचा : लाेकसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची टीका
गाडीने कट मारल्याने वाद (Beating)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.१२) सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान राहुल सोपान गुंजाळ (रा. कोल्हेवाडी रोड, सुकेवाडी, ता. संगमनेर) हे त्यांच्या दोन लहान मुली घेऊन दुचाकीहून एका वाढदिवसाला चालले होते. यावेळी नाटकी नाल्याजवळ असताना त्यांच्या पाठीमागून नंबर नसलेली एका पिकअप गाडी आली आणि कट मारुन निघुन गेली. पुढे गतिरोधक असल्याने पिकअपचा वेग कमी झाला तेव्हा गुंजाळ यांनी पिकअप चालकाकडे पाहिले. त्या क्षणी तो म्हणाला, की माझ्याकडे काय बघतो? असे म्हणत शिविगाळ करु लागला. मात्र, दुर्लक्ष करून सोबत मुली असल्यामुळे गुंजाळ पुढे निघाले. मात्र, पिकअप चालक अल्फाज शेख याने गाडी जोरात घेऊन त्यांना आडवी मारली. गाडीची चावी काढून घेत कोणताही प्रश्न न करता मोठमोठ्याने शिविगाळ करीत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे देखील वाचा : नीलेश लंके म्हणाले, अजून काही ठरलं नाही
सशस्त्र आलेल्या आठ जणांकडून मारहाण (Beating)
दरम्यान, त्याने फोन काढून तेथील काही व्यक्तींना कॉल केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात नाटकी परिसरात कोणी तलवार, कोणी कुऱ्हाडी, कोणी लाकडे तर कोणी लोखंडी रॉड घेऊन सात ते आठजण आले. त्यांनी गुंजाळ यांना मारहाण सुरू केली. तेवढ्यात रस्त्याने अमोल गुंजाळ, संदिप गुंजाळ, संकेत कोरडे, रवि गुंजाळ हे आले आणि त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना देखील सशस्त्र आलेल्या आठ जणांनी मारहाण सुरू केली. तर, पिकअप चालक शेख याने त्याच्या हातातील तलवार अमोल गुंजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी उगारली. मात्र, तो वार चुकला म्हणून अमोल वाचला तेव्हा अमोलने घटनास्थळाहून काढता पाय घेतला. याच दरम्यान, कोल्हेवाडी रोड परिसरात प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यामुळे पिकअप चालकाने देखील तेथून पळ काढला. त्यानंतर राहुल गुंजाळ यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पिकअप चालक अल्फाज शेख, अरबाज कुरेशी, समद कुरेशी (रा. संगमनेर) यांच्यासह पाच जणांना आरोपी केले आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते