Beating : नगर : भारतीय रेल्वेतील (Indian Railways) टीसीला मारहाण (Beating) करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या जवानाला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश (Judge) सुधाकर यार्लगड्डा यांनी १० हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली आहे. अनिलकुमार जयराम मतकर, असे शिक्षा झालेल्या सैन्य जवानाचे (Army man) नाव आहे.
नक्की वाचा: ‘छगन भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार’-मनोज जरांगे
तिकीट दाखविण्यास सांगितल्याने मारहाण
राजेशकुमार विश्वकर्मा हे ९ ऑगस्ट २०१५ रोजी नगर रेल्वे स्थानकात तिकीट तपासणी करत होते. त्यावेळी फलाट क्रमांक १ वर पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस आली. त्यावेळी अनिलकुमार मतकर हा मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जात असल्याचे विश्वकर्मा यांना दिसले. त्यांनी मतकरला तिकीट दाखविण्यास सांगितले. यावर मतकरने मित्राजवळ तिकीट असल्याचे सांगत एसी टब्यात प्रवेश केला. हे पाहून विश्वकर्माही तिकीट पाहण्यासाठी मतकरच्या मागे गेले असता त्याने विश्वकर्मा यांना मारहाण केली. यात विश्वकर्मा हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अवश्य वाचा: महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाचा शिक्कामाेर्तब : मंत्री विखे पाटील
सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल (Beating)
या प्रकरणी रेल्वे मार्ग पोलीस ठाण्यात विश्वकर्मा यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाणीचा गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय सपार यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, आनंदऋषी हॉस्पिटलचे डॉक्टर, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार व मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.