Beating : स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण; संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

Beating : स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण; संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

0
Beating : स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण; संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन
Beating : स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण; संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

Beating : श्रीरामपूर : निपाणी वडगाव (ता. श्रीरामपूर) येथील स्वस्त धान्य दुकानदाराला ई केवायसी (e-KYC) करण्याच्या वादातून मारहाण (Beating) केल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना मागणीचे निवेदन दिले.

अवश्य वाचा : भरदिवसा ट्रक चालकाचा गळा कापला; दोघे आरोपी जेरबंद

धान्य कसे देत नाही ते पाहतो, अशी दमबाजी

सध्या सर्वत्र धान्य दुकानातून कार्ड धारकांची ई केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याची मुदत १५ फेब्रुवारी पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुकानदार रेशनकार्डधारकांना फोन करून बोलावून ई केवायसी करत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील सहकारी सेवा संस्थेच्या धान्य दुकानात असलेले सेल्समन गणेश चव्हाण हे आपल्या दुकानात कार्डधारकांची ई केवायसी करत असताना शरद पवार या कार्डधारकाने त्या ठिकाणी मी ई केवायसी करणार नाही. मला धान्य दिलेच पाहिजे. मला धान्य कसे देत नाही ते पाहतो, अशी दमबाजी केली. तसेच शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने दुकानदार ऐकत नसल्याचे पाहून दुकानदारास मारहाण केली.

नक्की वाचा : भारताला मोठा धक्का!जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

दमबाजी केल्यास संबंधिताचे रेशन कार्ड रद्द (Beating)

या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी निवेदन स्वीकारताना तहसीलदार मिलिंद कुमार वाघ म्हणाले की, हे शासकीय काम आहे. कार्डधारकांची ई केवायसी होणे गरजेचे आहे. जे कार्डधारक ई केवायसी करत नसेल त्यांचे नाव कमी केले जाईल. ही केवायसी करताना कोणीही धान्य दुकानदारांना अरेरावी अथवा दमबाजी केल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करून त्याचे रेशन कार्ड रद्द केले जाईल.

जिल्हाध्यक्ष देविदास देसाई म्हणाले की, आमचे धान्य दुकानदार विना मोबदला ई केवायसीचे काम करत आहे. विना मोबदला हे काम करत असताना दुकानदारांना शिवीगाळ करणे मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे, अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई न झाल्यास आम्ही धान्य दुकाने बंद ठेवू, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचिव रज्जाक पठाण, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे, राधाकृष्ण आहेर, राजेंद्र वाघमारे, गणेश चव्हाण, नरेंद्र खरात, आशिका उबाळे, देवराम गाढे, योगेश नागले, सचिन मानधने आदी उपस्थित होते.