Beating : फळविक्रेत्याला लोखंडी रॉड ने मारहाण; २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Beating : फळविक्रेत्याला लोखंडी रॉड ने मारहाण; २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

0
Beating : फळविक्रेत्याला लोखंडी रॉड ने मारहाण; २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल
Beating : फळविक्रेत्याला लोखंडी रॉड ने मारहाण; २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Beating : नगर : केडगाव (Kedgaon) येथे रस्त्यावर फळविक्री करणार्‍या तरूणावर तब्बल २० ते २५ अनोळखी इसमांनी हल्ला (Attack) केला. तु फळांना थुंकी लावून ग्राहकांना विकतोस असा आरोप करत लाकडी दांडके, लोखंडी पाईप, कमरेचे बेल्ट व लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) केली. तौफिक लतीफ बागवान (वय २६, रा. गजानन कॉलनी, मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.

अवश्य वाचा: अतिवृष्टी बाधीत लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या- मंत्री विखे पाटील

२०ते २५ अनोळखी इसमां विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, पेरूला थुंकी लावून ते विक्री करत असल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी तौफिक विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोमवारी (ता. १५) २०ते २५ अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नक्की वाचा: मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार

फळांना थुंकी लावून विकतोस असा आरोप करत मारहाण (Beating)

तौफिक आपल्या वडिलांसह केडगाव परिसरात रस्त्यावर फळविक्री करतो. रविवारी (ता. ७) दुपारी १.३० वाजता तो अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील महावितरणच्या कार्यालयासमोर त्याच्या दुचाकीवर पेरूचे क्रेट ठेवून विक्री करत होता. तेवढ्यात २० ते २५ जण दुचाकीवरून आले. त्यांनी घोषणाबाजी करत तौफिक याला घेरले. शिवीगाळ करत त्यांपैकी एकाने मोबाईलमधील व्हिडिओ दाखवून तु फळांना थुंकी लावून विकतोस असा आरोप केला. त्यानंतर सर्वांनी मिळून लाथाबुक्यांनी तसेच दांडके, लोखंडी पाईप व कमरेच्या पट्ट्याने तौफिकवर हल्ला करून गंभीर दुखापत केली. जखमी तौफिक बागवान याने रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.