Beed | नगर : बीडमध्ये (Beed) सुरू असलेल्या पोलीस (Police) भरती प्रक्रियेदरम्यान आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. मैदानी शारीरिक चाचणीदरम्यान धावण्याच्या फेरीत सहभागी झालेला एक उमेदवार अचानक चक्कर येऊन मैदानावर कोसळला.
हे वाचा – पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
उपचारासाठी रुग्णालयात दाखल (Beed)
उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्या उमेदवाराला उचलून बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे भरती केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इतर उमेदवारांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात आली.
हे पहा – अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…
पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू (Beed)
मृत तरुणाचे नाव दीपक भास्कर वावळ असून तो परळी तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी आज ८०१ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यातील २५१ उमेदवारांनी भरती चाचणीकडे पाठ फिरवली. ५५० उमेदवारांनी आज हजेरी लावली. यात ५०३ उमेदवार अपात्र तर ४७ उमेदवार पात्र ठरले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अहिल्यानगरमधील पोलीस भरती प्रक्रियेची पाहणी करून सूचना दिल्या. त्यानुसार अहिल्यानगरमध्ये भरती प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.



