Beed Crime : राज्यात बीड जिल्हा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यातच आता बीडचे जिल्हा शल्क चिकित्सक डॉ.अशोक थोरात (Dr Ashok Thorat) यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे डॉ.थोरात यांना निलंबित करण्यात यावे,अशी मागणी आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी विधानसभेत केली. यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी बीड जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांना निलंबित (Suspend)केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
नक्की वाचा : कॉमेडियन कुणाल कामराची चार पानी पोस्ट चर्चेत;पोस्टमध्ये नेमकं काय ?
नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीत काय ?(Beed Crime)
विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडताना म्हटले की, बीडचे जिल्हा शल्क चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बीडमध्ये झाला आहे. हा भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांची या प्रकरणात चौकशी झाली. या चौकशीत ते दोषी सापडले होते.दोषी सापडल्यानंतर त्यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे त्यांनी काय केले हे माहीत नाही. मात्र त्यानंतर परत जिथे भ्रष्टाचार झाला तिथे बीडमध्ये त्यांची सिव्हिल सर्जन म्हणून बदली करण्यात आली. हे बरोबर आहे का? जिथे इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार झाला, त्यांना पुन्हा इकडे परत कसे आणले गेले? या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? त्यांचे तुम्ही निलंबन करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अवश्य वाचा : ‘मी आरोपांवर उत्तर देत नाही’;कुणाल कामराच्या गीतावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
बीड जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरातांचं निलंबन (Beed Crime)
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यावर म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. निश्चितपणाने सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपण सस्पेंड करत आहोत. त्यांना निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांची चौकशी पूर्ण करण्यात येईल. यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.