Beed Crime : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.आता पुन्हा एकदा बीडमध्ये (Beed Crime) एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण (Beating) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या (Santosh Deshmukh Murder Case) कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.
नक्की वाचा : पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे!
नेमकं काय घडलं ?(Beed Crime)
परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी (ता.१६) सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरूणाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले. याठिकाणी समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराज दिवटेला लाठ्याकाठ्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या स्वराची रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता बीड पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अवश्य वाचा : बिअरप्रेमींसाठी खुशखबर!२०० ची बिअर आता मिळणार अवघ्या ५० रुपयांना
बीडमध्ये गुन्हेगारी सुरूच ?(Beed Crime)
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. शिवराज दिवटे याला अशीच जबर मारहाण होत असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी खपवून घेणार नाही,असा इशारा दिला होता. त्या दृष्टीने पोलिसांना मोकळीक देण्याची भाषाही त्यांनी केली होती. मात्र, अजित पवारांसारखा खमका आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता पालकमंत्री असूनही बीडमधील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही.