Beed Railway : नव्याने बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली; अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर स्वागत

Beed Railway : नव्याने बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली; अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर स्वागत

0
Beed Railway : नव्याने बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली; अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर स्वागत
Beed Railway : नव्याने बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली; अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर स्वागत

Beed Railway : नगर : बीड ते अहिल्यानगर अशी नवी रेल्वे (Beed Railway) सेवा बुधवार (ता. १७) सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या नवीन रेल्वेचे (Railway) ऐतिहासिक अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर (Ahilyanagar Railway Station) जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी रेल्वेचे मुख्य चालक अतिक शेख व सहाय्यक चालक जितेंद्र बी. यांचा सत्कार करण्यात आला.

बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…

अपघाताच्या घटना टाळण्यास मदत मिळणार

यावेळी जिल्हा प्रवासी संघटनेचे हरजीतसिंह वधवा, स्टेशन मास्तर सुधीर महाजन, तसेच अशोक कानडे, अनिल सबलोक, प्रशांत मुनोत, अशोक शिंगवी, संदेश रपारिया, राजू वर्मा, विपुल शाह आदी उपस्थित होते. रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे बीडवरून अहिल्यानगरला येणाऱ्या तसेच अहिल्यानगरहून बीडला जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघाताच्या घटना टाळण्यास मदत मिळणार आहे.

अवश्य वाचा: ‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करावी; आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

हरजीतसिंह वधवा म्हणाले, (Beed Railway)

बीडकरांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाली आहे. बीड आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांतील जनतेसाठी रेल्वेसेवा ही जीवनवाहिनी ठरणार आहे. रस्त्यावरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, वाढते अपघात आणि प्रवासातील त्रास याला आता आळा बसणार आहे. रेल्वेमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णसेवेसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही रेल्वे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.