Beedi Workers : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; बिडी कामगारांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन

0
Beedi Workers : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; बिडी कामगारांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन
Beedi Workers : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; बिडी कामगारांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन

Beedi Workers : नगर: गोरगरीब गरीब बीडी कामगारांच्या (Beedi Workers) घरांची जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप बिडी कामगारांनी केला आहे. याबाबत संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल (Case Filed) करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी आज (ता.२६)पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) कार्यालयासमोर कामगारांनी आंदोलन केले.

नक्की वाचा : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

आदी उपस्थित

यावेळी विडी कामगार राहुल गाजुल, नरसिंग वडलाकोंडा, अभय बुरुगुल, धनंजय सुंकी, कृष्णा चिट्ट्याल, योगेश म्याकल, ओंकार रामगिरी, श्रीनिवास वंगार, शंकर कोंडा, नर्मदा कोंडा, विष्णू बोलली, सत्यभामा हिरावती, रमेश बल्लाळ, वैभव अरकल, शंकर वंगार, मोहन चेन्नुर, सुरेश रंगा, सूर्यकांत श्रीपत, महेश गुरुड, शंकर अन्नलदास, विष्णू दुव्वा, मोहन बौज्जा, संजय आकुबत्तीन, पद्मा कोंडा, अंबादास मादास, पूजा चिट्टयाल, अनिता अल्ली, रत्नमाला आडेप, स्वाती सब्बन, अनिता गुंडू, बालमनी कोंडा, मेघा बोगा, सुजाता कंडेपेल्ली, गुरुदत्त जेटला, गणेश दासर, बालाजी दिकोंडा, विजया दावरशेट्टी, पद्मा सब्बन, बालमनी एकलदेवी, बालाजी कोक्कुल,अशोक एकलदेवी, देवीदास जक्कल आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : भारताकडून K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;२ टन अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता

निवेदनात म्हटले आहे की, (Beedi Workers)

पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम व इतर साथीदार याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यास पोलीस प्रशासन हे मोठ्या प्रमाणात टाळाटाळ करीत आहे. पद्मपुरी गृहनिर्माण संस्थेच्या नागरीकांचे निवा-यांचे ठिकाण २२० सभासदांचे प्लॉट बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा करार या मास्टर माईडने करून हजारो समाजातील लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील संस्थेचे सुमारे १हे. २०आर जागा अंदाजे ७ कोटी ५० लाख रुपये किंमतीची जागा अगदी ४२ लाख ९० हजार या कवडीमोल भावाने विकण्याचा प्रयत्न करून करोडो रुपयांचा घोटाळा करणा-या व समाजातील नागरिकांना बेघर करणा-या समाजद्रोही मनोज लक्ष्मण दुलम व इतर यांचे विरुध्द गुन्हा दाखल करावा करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.