नगर : भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.तर दुसरीकडे या मंदीच्या सावटाखाली जागतिक बाजारपेठेत काही संधी देखील निर्माण झाल्या आहेत. अशीच एक मोठी संधी भारत आणि ब्रिटन (India and Britain) यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या (Free Trade Agreement) रूपाने समोर आली आहे. भारताने ब्रिटनच्या बिअरवरील कर तब्बल ७५ टक्क्यांनी कमी (Beer Price Gets Down) केला आहे. यामुळे २०० रुपये किमतीची बिअर आता अवघ्या ५० रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. बिअरप्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर मानली जात आहे.
नक्की वाचा : पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे!
भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार (Beer Price Gets Down)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बिअरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि अनेकदा आपल्याला आवडणारी थंड बियर आणि ब्रँड मिळणे कठीण होतं. मात्र,अलीकडे भारताने ब्रिटनच्या बिअरवरील करात तब्बल ७५ टक्क्यांनी कपात केल्याने ब्रिटनमध्ये बियरच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. तर ब्रिटनचे बिअर ब्रँड्स आता भारतात स्वस्त होणार असून २०० रुपये किमतीची बिअर आता अवघ्या ५० रुपयांना म्हणजेच निम्म्यापेक्षा कमी किमतीला मिळू शकणार आहे.
अवश्य वाचा : आता पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार;गृह विभागाचा निर्णय
ब्रिटनच्या बिअरवरील करात तब्बल ७५ टक्क्यांनी कपात(Beer Price Gets Down)
समोर आलेल्या माहितीनुसार,ब्रिटनच्या बिअरवर भारताकडून जवळ जवळ १५० टक्क्यांपर्यंतचा कर लागत होता.आता भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे हा कर थेट ७५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. परिणामी,या करारानुसार आयात शुल्कामध्ये मर्यादित सवलत देण्यात आली आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात हा महत्त्वपूर्ण करार ६ मे २०२५ रोजी झाला. याच महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ब्रिटनच्या ब्रँडची बिअर भारतात मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे.