Bengaluru Murder Case : महाराष्ट्रातील एका ३२ वर्षीय तरुणीचा (A 32-year-old woman from Maharashtra) मृतदेह (Corpse) बंगळुरूतील (Bengluru) एका फ्लॅटमध्ये सुटकेसमध्ये ठेवल्याचं आढळून आलं आहे. या तरुणीच्या पतीला हत्येच्या संशयावरून महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित गौरी खेडेकरच्या पतीने घरमालकाला फोन करून फ्लॅटमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर घरमालकाने पोलिसांना हा प्रकार कळवला.
नक्की वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरण;सुदर्शन घुलेनी दिली खून केल्याची कबुली
राकेश खेडेकरला महाराष्ट्रातून अटक (Bengaluru Murder Case)
गौरी खेडेकर ही तिचा पती राकेश खेडेकरबरोबर हुलीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोड्डा कम्मनहल्ली परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होती. राकेश एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. आता बंगळुरू पोलिसांनी राकेश खेडेकरला महाराष्ट्रातून ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे.
वॉशरूममध्ये ठेवलेल्या सुटकेसमध्ये आढळला मृतदेह (Bengaluru Murder Case)
नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर एक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचला होता. सुरुवातीला त्याला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे वाटले. मात्र जेव्हा तो घटनास्थळी गेला तेव्हा गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला.“फॉरेन्सिक विश्लेषकांना मृत तरुणीच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे आढळले आहे,”असे पोलिसांनी सांगितले. या घटनेसंदर्भांत माहिती देताना बंगळुरूच्या पोलीस उपायुक्त सारा फतीमा यांनी, “महिलेचा मृतदेह वॉशरूममध्ये ठेवलेल्या सुटकेसमध्ये आढळला,”असे सांगितले आहे.
अवश्य वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते,त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला’-संभाजी भिडे
पोलीस अधिकाऱ्यांनीदिलेल्या माहितीनुसार,घरमालकाने संध्याकाळी ५.३० वाजता नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यावेळी त्यांना घराला कुलूप लावल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना वॉशरूम मध्ये सुटकेस आढळली. ज्यामध्ये गौरी खेडेकरचा मृतदेह होता.