Bengaluru Stampede: बंगळूरू चेंगराचेंगरी प्रकरणी RCB दोषी ;केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणाची माहिती

0
Bengaluru Stampede:बंगळूरू चेंगराचेंगरी प्रकरणी RCB दोषी ;केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणाची माहिती
Bengaluru Stampede:बंगळूरू चेंगराचेंगरी प्रकरणी RCB दोषी ;केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणाची माहिती

Bengaluru Stampede : आयपीएल जिंकल्यानंतर कर्नाटकमधील बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी (Stampede) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB Team) टीम जबाबदार असल्याचं केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने (CAT) म्हटलं आहे. इतक्या कमी वेळात गर्दी नियंत्रित करायला पोलिस काही जादूगर नाहीत असंही कॅटने म्हटलं. या प्रकरणी सरकारने निलंबित केलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रभर घुमतोय अहिल्यानगरमधील टाळांचा नाद!
२०२५ ची आयपीएल स्पर्धा जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या समर्थनार्थ ४ जून २०२५ रोजी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र या स्टेडिअमबाहेर चेंगराचेंगरीची घटना झाली आणि त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. त्या विरोधात आयपीएस अधिकारी विकास कुमार यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती.

अवश्य वाचा :  रेल्वेभाडेवाढ ते तत्काळ तिकीट;भारतीय रेल्वेच्या नियमामध्ये आजपासून मोठे बदल 

चेंगराचेंगरीसाठी आरसीबी जबाबदार (Bengaluru Stampede)

बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी साठी कॅटने प्रथमदर्शनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम व्यवस्थापनाला जबाबदार ठरवलं आहे. ट्रिब्युनलने नमूद केलं की, आरसीबीने सोशल मीडियावर विजयी मिरवणुकीचं आमंत्रण पोस्ट केलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. मात्र, पोलिसांना योग्य व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, कारण आरसीबीने पोलिसांची पूर्वपरवानगी घेतली नव्हती. CAT ने वरिष्ठ आयपीएस अधिकारी विकास कुमार यांचं निलंबन ही रद्द केलं. ट्रिब्युनलने राज्य सरकारने निलंबनाचा निर्णय घाईघाईने आणि पुरेशा पुराव्यांशिवाय घेतल्याचं म्हटलं आहे. पोलिसांकडे ‘अलादीन का चिराग’ नाही की ते १२ तासांत ३ लाख लोकांची व्यवस्था करू शकतील.

 आरसीबी विरोधात गुन्हा दाखल (Bengaluru Stampede)

चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर बंगळुरुच्या कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये आरसीबी, डीएनए, केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या  घटनेत निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.