Bhagwan Fulsoundar : अन्यायकारक घरपट्टी रद्द करा; भगवान फुलसौंदर यांचा आयुक्तांना इशारा

Bhagwan Fulsoundar : अन्यायकारक घरपट्टी रद्द करा; भगवान फुलसौंदर यांचा आयुक्तांना इशारा

0
Bhagwan Fulsoundar : अन्यायकारक घरपट्टी रद्द करा; भगवान फुलसौंदर यांचा आयुक्तांना इशारा
Bhagwan Fulsoundar : अन्यायकारक घरपट्टी रद्द करा; भगवान फुलसौंदर यांचा आयुक्तांना इशारा

Bhagwan Fulsoundar : नगर : अन्यायकारक घरपटटी (House tax), नोटीस रद्द करावी, अशी मागणी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर (Bhagwan Fulsoundar) यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांच्याकडे केली आहे. कर आकारणी रदद न केल्यास नागरिकांसमवेत जनआंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नक्की वाचा : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महापालिका नफा कमावणारी नसून सेवा देणारी संस्था

महापालिकेने सुधारीत व अन्यायकारक कर आकारण्यात आलेले असून संदर्भांत दिल्ली येथील खासगी कंपनीर्माफत सर्व्हेचे काम झाले आहे. या  कंपनीला हे काम अंदाजे ४ ते ५ कोटी रुपयांना दिले आहे. ही कंपनी व अधिकारी कर्मचारी संगनमताने शहरातील नागरिकांची आर्थिक लुट करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. वास्ताविक नगर शहर सर्वसामान्याचे गाव आहे. इथे कोणत्याही मोठया रोजगाराचे स्थान नसल्याने आर्थिक स्थर खालावलेला आहे. महापालिका ही नफा कमावणारी संस्था नसून सेवा देणारी संस्था आहे. महापालिकेच्या दवाखान्यामध्ये कुठलीही वैदयकीय सुविधा मिळत नाही. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य, पाणी, रस्ते, लाईट या सेवा तुटपुंज्या आहेत. शहरातील स्वच्छतागृहे पाडलेली आहेत. पार्किगच्या नावाखाली ठेकेदार नागरिकांची लुट करत आहेत.

अवश्य वाचा : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन

जुन्या मालमत्तेला सुध्दा चारपट टॅक्स वाढवला (Bhagwan Fulsoundar)

आता ठेकेदार संस्थेने सर्व्हे करताना घरातील खोली समवेत बाल्कनी, ओपन, पसेज, पाकिंग, पोर्च जनावराचे गोठे यासाहित कर आकारणी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक जुन्या मालमत्तेला सुध्दा चारपट टॅक्स वाढलेला आहे. शहरात काही मिळकत धारकाकडे भाडेकरी आहे. त्यांना आर्थिक मागणी करून तडजोड केली जात आहे. ज्यांनी पैसे दिले नाही, त्यांना भाडयाप्रमाणे कर आकारणी करून भरमसाठ टॅक्स वाढवलेला आहे. कर आकारणी करताना आरसीसी, लोड बेरिंग, पत्रा, टी अंगल आदीनुसार दर असताना प्रत्येक घरांना आरसीसी जास्तीचे दर लावलेले आहे. त्यामुळे कुठल्याही सुविधा न पुरवता घरपटटीचे अन्यायकारक बिले वाटप करून नागरिकांचे कंबरडे मोडण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.