Bhagwan Mahavir : नगर : जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी (Bhagwan Mahavir) जन्म कल्याणक मिरवणूक नगर शहरात (Nagar City) भक्तिमय वातावरणात झाली. सत्य व अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या विचारांचे स्मरण करीत नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने (Jai Anand Mahavir Youth Club) दरवर्षीप्रमाणे महावीर स्वामींचा ‘जगा व जगू द्या’ हा संदेश दिला. समस्त प्राणीमात्रांचे कल्याण हाच मानवधर्म असल्याची शिकवण देणारी चौक सजावट करताना मंडळाने केली होती. अहिंसा परमो धर्म:, समस्त प्राणीमात्राची सेवा, जगा आणि जगू द्या, असे संदेश या सजावटीतून देण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणुकीचे जय जिनेंद्र, जय महावीर अशा गजरात नवीपेठ येथे स्वागत करण्यात आले.
नक्की वाचा : आरोग्य सेवेचे सशक्तीकरण ‘मिशन मोड’वर
याप्रसंगी बोलताना मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले की,
मंडळाच्या नावातच भगवान महावीर स्वामी व आचार्यश्रींचे नाव आहे. त्यामुळे या महान विभूतींच्या विचारांचे तंतोतंत पालन करीत मंडळ सामाजिक तसेच धार्मिक कार्यात अग्रेसर असते. भगवान महावीरांनी समस्त मानवजातीबरोबरच भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्राच्या कल्याणाचा संदेश दिला. सत्य व अहिंसेचे तत्त्वज्ञान त्यांनी समाजाला दिले. अहिंसा परमो धर्म: सांगणारे त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून मंडळाने नेहमीच या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे काम केले आहे.
अवश्य वाचा : रामनवमी मिरवणूक; मंडळ पदाधिकारी व डीजे मालक-चालकांविरूध्द गुन्हा
आनंद मुथा म्हणाले, (Bhagwan Mahavir)
भगवान महावीर स्वामी यांचे विचार आचरणात आणल्यास प्रत्येकाचे कल्याण साधते. कालच सर्वत्र विश्व नवकार महामंत्र’ दिवस साजरा करण्यात आला. मंडळानेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पुरुष , महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.
नगर : अहिंसा परमो धर्म: अशा महान उपदेश देत संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या भगवान महावीर स्वामींची जयंती (जन्मकल्याणक) गुरुवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याशिवाय चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले.
भगवान महावीर दिनी सकाळी 7.30 वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून भव्य प्रारंभ झाला. या शोभायात्रेत सनई, नगारा, चौ बॅण्ड पथक, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व लाल साड्या परिधान केलेल्या महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामींची भव्य प्रतिमा असलेले वाहन रथ व शेवटी अनुकंपा गाडीही होती. आनंद संस्कार शिक्षा अभियान मंडळाच्या मुला मुलींनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच त्यांनी हातात जैन ध्वज व भगवान महावीरांचे संदेश असलेले फलक घेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भगवान महावीर निमित्त नगरमध्ये भव्य शोभायात्रा, त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष
आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या सान्निध्यात महावीर स्वामींचे गुणगान, विविध स्पर्धांचे बक्षिसे जाहीर
कापडबाजार जैन मंदिर येथून निघालेली शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे दाखल झाली. शोभायात्रा मार्गावर विविध मंडळे, जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणा देण्यात आल्या.
आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज, प्रबुध्द विचारक पू.आदर्शऋषीजी महाराज, संस्कारप्रेमी पू.आलोकऋषीजी महाराज, पू.सत्यप्रभाजी म.सा., पू.त्रिशलाकंवरजी म.सा., पू.विश्वदर्शनाजी., पू.विपुलदर्शनाजी आदी आदी साध्वीजींच्या उपस्थितीत प्रवचन तथा गुणगाण झाले.
यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, आनंदराम मुनोत, वसंत लोढा, संजय चोपडा, अशोक (बाबूशेठ) बोरा, संतोष गांधी, महावीर बडजाते आदी उपस्थित होते. खा.निलेश लंके यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज म्हणाले की, भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारे असते. आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे.
आदर्शऋषीजी महाराज म्हणाले की, आज हजारो वर्षानंतरही भगवान महावीर स्वामींचे विचार मानव जातीला तारणारे आहेत. यातूनच त्यांची महानता कळून येते. आपण भगवान महावीरांचे अनुयायी आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे. आजच्या जगात युध्दजन्य परिस्थिती आहे. अशावेळी भगवान महावीरांच्या विचारांची गरज आहे. भगवान महावीर यांच्यामुळे आपण आहोत हे लक्षात ठेवून प्रत्येकाने मनोमन त्यांचे तत्वज्ञान जीवनात अंमलात आणण्याचा संकल्प करावा. कार्यक्रमाच्या शेवटी पेमराज, संतोष व सतीश बोथरा (पारस ग्रुप) परिवाराच्यावतीने गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली.
जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी भगवान महावीर जीवन मनोगत करून विविध स्पर्धांचा निकाल जाहीर केला. रांगोळी स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथक क्रमांक- गुगळे परिवार (चितळे रोड), व्दितीय क्रमांक विभागून- मिनल पारख, राखी गांधी, सपना गुगळे, पूनम चोरडिया व प्रेक्षा जितेंद्र नहार, दर्शना जितेंद्र नहार, नवीपेठ, तृतीय क्रमांक विभागून- तनिषा देसरडा व मित चंगेडे, राणी चंगेडे, ख्रिस्त गल्ली. उत्तेजनार्थ- प्रिया गांधी (ख्रिस्तगल्ली), दर्शना अभिलाषा बोथरा (आडतेबाजार), दीपाली नितीन मुनोत (नवीपेठ), दिगंबर जैन महिला मंडळ.
चौक सजावट प्रथम क्रमांक- गुगळे परिवार चितळे रोड, व्दितीय क्रमांक – जय आनंद महावीर युवक मंडळ, नवीपेठ, तृतीय क्रमांक- जय आनंद फौंडेशन, दाळमंडई, उत्तेजनार्थ- बोथरा परिवार (आडतेबाजार), जैन दिगंबर मंदिर.स्पर्धेचे परीक्षण शैला गांधी, संगिता गांधी, सरोज कटारिया यांनी केले